Monday, 15 February 2016

महाराष्ट्रातील 3 महानगर पालिकांना ‘स्वच्छ सर्वेक्षण’ पुरस्कार


नवी दिल्ली, 15: केंद्र शासनाच्या  स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देशातील 15 शहरांना स्वच्छ सर्वेक्षण-2016पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड, ब्रृहन्मुंबई महानगर पालिका आणि नागपूर महानगर पालिकेचा समावेश आहे.
 येथील राष्ट्रीय मिडीया सेंटरच्या सभागृहात केंद्रीय नगर विकास मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण-2016 मध्ये निवड झालेल्या शहरांची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय नगर विकास मंत्री श्री वैंकय्या नायडू यांच्या हस्ते देशातील 15 महानगर पालिकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर शंकुतला धराडे महानगर पालिका आयुक्त राजीव जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला. ब्रृहन्मुंबई महानगर पालिकेच्या उपमहापौर डॉ. अलका केरकर, अतिरीक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी पुरस्कार स्वीकारला. नागपूर महानगर पालिकेतर्फे महापौर प्रवीण दटके, अतिरीक्त आयुक्त नैना गुंडे यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप प्रशस्ती पत्र असे आहे.
स्वच्छ सर्वेक्षण-2016 अंतर्गत निवड करण्यात आलेल्या 73 शंहराची घोषणा करण्यात आली. यामध्ये 10 लाखांच्या वर लोकसंख्या असणारे 53 शहरांचा समावेश. तसेच 22 राजधानीच्या शहरांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या शहरांमध्ये सर्वांगिण स्वच्छतेला सर्वाधिक महत्व देण्यात आले आहे.
73 शहरांची निवड विविध निकषाद्वारे करण्यात आली आहे. यामध्ये स्वच्छतेचे विविध मापदंड, सेवा स्तर दर्जा अतंर्गत 1000 गुण ठेवण्यात आले. यातंर्गत उघडयावर शौच, एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन, माहिती, शिक्षण, संचार वर्तणुकीतील बदल, घरोघरी जाऊन कचरा उचलणे, सार्वजनिक शौचालय, व्यक्तीगत शौचालय यांचे निरीक्षण करण्यात आले.
स्वतंत्र निरक्षिणांतर्गत 500 गूण ठेवण्यात आले. यामध्ये शहरातील अनधिकृत गलिच्छ वस्त्यांमध्ये सोयी सुविधा पुरवीणे, महानगर पालीकेच्या अंतर्गत येणा-या कॉलोनीचे नियोजन करणे. व्यावसायीक, धार्मिक जागेवर स्वच्छता पाळणे, अशा विविध श्रेणींचा समावेश यामध्ये होता. नागरीकांच्या अभिप्रायाचे 500 गुण ठेवण्यात आले. असे एकूण 2000 गुणांची चाचणी घेण्यात आली. यापैकी ज्या शहरांना 1400 च्या वर गुण मिळाले त्यांना लीडरर्स शहरांचा दर्जा प्राप्त झाला. यामध्ये पिंपरी चिंचवड आणि ब्रृहन्मुंबई महानगर पालिकेचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला उपग्रह तंत्रज्ञानात अग्रेसर शहरांच्या श्रेणीत सर्वोत्कृष्ट शहराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला 2000 गुणांपैकी 1533 गुण मिळाले.  ब्रृहन्मुंबई महानगर पालिकेला मोठया शहरांच्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट शहराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बृहन्मुंबई महानगर पालिकेला 1530 गुण मिळाले.

पश्चीम क्षेत्रातील उदयोन्मुख महानगर पालिकांमध्ये राज्यातील नागपूर महानगर पालिकेला सन्मानित करण्यात आले. स्मार्ट सिटी योजनेत 400 शहरांच्या यादीत 256 व्या क्रमांकावर असणारे नागपूर शहराने स्वच्छतेचे सर्व मापदंड पाळीत आपला क्रमांक्र 20 वर आणला असून एकूण 2000 गूणांपैकी विविध श्रेणीमध्ये 1348 गुण प्राप्त केले. नागपूर महानगर पालिकेने राबविलेल्या घरोघरी जावून कचरा वेचण्याच्या उपक्रमामुळे शहर कचरा मुक्त झाले. त्याकरिता नागपूर महानगर पालिकेला गौरविण्यात आले. 

No comments:

Post a Comment