Friday 26 February 2016

विविध राज्यांच्या माहिती अधिका-यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट


नवी दिल्ली, २६ : विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांसह महाराष्ट्रशासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांनी शुक्रवारी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची माहिती जाणून घेतली.   
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने हॉटेल रॉयल प्लाझा येथे शासनातील जनसंपर्क विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ अधिका-यांसह राजस्थान, झारखंड, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगाना,कर्नाटक, तामीळनाडू, आसाम, सिक्कीम, मणिपूर, दिल्ली, नागालँड, अंदमान व निकोबार या राज्य व केंद्रशासीत प्रदेशांतून माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.     
       यावेळी औपचारिक वार्तालापही झाला.महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविध्यपूर्ण माहिती उपसंचालक श्री. कांबळे यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय व महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम आदींची माहितीही श्री. कांबळे यांनी दिली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना या अधिका-यांनी भेट देऊन पाहणी  व चौकशी  केली.                                   

No comments:

Post a Comment