नवी दिल्ली, 12 : रशियाच्या स्वर्द लोस्क प्रांताचे गव्हर्नर येवेगेनी कुयाशेव यांनी शनिवारी महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘इनोप्रोम 2016’ आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे
निमंत्रण दिले.
गव्हर्नर येवेगेनी कुयाशेव यांच्या नेतृत्वाखालील
शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र सदन येथे मुख्यमंत्री
फडणवीस यांची भेट घेतली .
दिनांक 11 ते 14 जुलै 2016 दरम्यान
रशियातील एकातेरेनबर्ग येथे आयोजित करण्यात येणा-या ‘इनोप्रोम 2016’ आंतरराष्ट्रीय
व्यापार मेळाव्याचे निमंत्रण यावेळी गव्हर्नर
येवेगेनी कुयाशेव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. भारत या व्यापार मेळाव्याचा
सहयोगी देश आहे. यावेळी झालेल्या बैठकीत उभय
नेत्यांनी महाराष्ट्र आणि स्वर्द लोस्क प्रांता
दरम्यान विविध क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत चर्चा केली
.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी
यावेळी गव्हर्नर येवेगेनी कुयाशेव यांना वारली
पेंटींग आणि नाशिक येथे पारपडलेल्या कुंभ मेळयाचे कॉफी टेबल बुक भेट स्वरूपात
दिले .
00000
No comments:
Post a Comment