नवी दिल्ली, 12 मार्च : महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे प्रथम मुख्यमंत्री
यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय
केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले. निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार
आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक
निवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, सहायक निवासी आयुक्त संजय आघाव, सहायक निवासी
आयुक्त अजित सिंग नेगी तसेच सदनात निवासी असलेले
गणमान्य व्यक्तींसह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रातील
अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी यशवंतराव
चव्हाण यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांची जयंती
साजरी करण्यात आली. यावेळी. याप्रसंगी माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी
प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कर्मचा-यांनेही प्रतिमेस पुष्प
अर्पण करून आदरांजली वाहीली.
No comments:
Post a Comment