नवी दिल्ली, 3 : पुणे रिंग रोडचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले असून पुणे विमानतळ विस्तारीकरणाची प्रकिया अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी आज नितीन गडकरी यांची त्यांच्याशासकीय निवास स्थानी भेट घेतली. त्यावेळी श्री. गडकरी यांनी ही माहिती दिली.
पुणे रिंग रोडबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून रिंग रोडचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले असल्याचे श्रीगडकरी यांना या बैठकीत सांगितले. पुण्याच्या लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी संरक्षण मंत्रालयाकडे असलेली जमीन हस्तांरणप्रक्रिया अंतीम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.
याबैठकीत श्री. बापट यांनी पुणे ते दिघी पोर्टपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या सवीस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम अंतीमटप्प्यात असल्याचे श्री बापट यांनी श्री गडकरी यांना सांगितले.
पुणे मेट्रोला लवकरच अंतीम मंजुरी – व्यंकय्या नायडू
श्री बापट यांनी केंद्रीय नगर विकास मंत्री श्री वैंकय्या नायडू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत श्री नायडू यांनी पुणेम मेट्रोला लवकरच अंतीम मंजुरी देण्यात येणार असल्याचे सांगितले. भेटीदरम्यान श्री. बापट यांनी पुणे महानगरपालिकेने पुणे मेट्रोबाबतत्रुटींची पुर्तता केली असल्याची माहिती दिली. यामुळे पुणे मेट्रोच्या प्रकल्पास गती येणार असल्याचे श्री बापट यांनी सांगितले. दिल्ली मेट्रोप्राधिकरणाने पुणे मेट्रोचा सवीस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने 2013 साली मंजुरी दिली.
अन्न पूर्णा योजनेचा निधी मिळावा -गिरीष बापट
अन्नपूर्णा योजनेचा थकीत निधी मिळावा यासाठी आज अन्न व नागरी पूरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री श्री गिरीश बापट यांनी केंद्रीय नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांची संसदेत भेट घेतली.
ऑक्टोंबर 2015 ते मार्च 2016 चा अन्नपूर्णा योजनेचा निधी अद्याप मंजूर झालेला नाही. राज्यात अन्नपुर्णा योजनेचे 78,425लाभार्थी आहेत. तरी हा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून मिळावा अशी मागणीही श्री बापट यांनी श्री पासवान यांना यावेळी केली.
No comments:
Post a Comment