नवी दिल्ली, ०5 : येत्या आर्थिक वर्षापासून राज्यातील बचत गटांना बीन व्याजी
कर्ज दिले जाईल, अशी
माहिती महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे
यानी आज येथे दिली.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या
औचित्य साधत 5-6 मार्चला दोन दिवसीय ‘महिला लोकप्रतिनिधी-सशक्त भारताची निर्माता’ या विषयावर देशभरातील महिला लोकप्रतिनिधींचे राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन विज्ञान
भवन येथे करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव
मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अंसारी, लोकसभा
अध्यक्षा सुमित्रा महाजन, पंतप्रधान नंरेद्र मोदी, प्रवक्ता डॉ. शिरिन
शर्मिन चौधरी, जतिया संसद, बांग्लादेश
मंचावर उपस्थित होते. राज्यातील महिला व बाल विकास
मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर, यासह
महाराष्ट्रातील महिला खासदार व आमदार
उपस्थित होत्या. याशिवाय देशभरातील
महिला खासदार, आमदार, वरीष्ठ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित
होते. या कार्यक्रमाचे आयोजन लोकसभा
अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
महिला या खूप इमानदार असतात. त्यामुळेच
राज्यातील बचत गटांतर्फे घेण्यात येणारे कर्ज 100 टक्के परत दिले जाते. म्हणूनच
राज्यातील बचत गटाला शुन्य टक्के व्याज
दराने कर्ज देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्याची अमंलबजावणी पुढील आर्थिक
वर्षापासून केली जाईल. यासाठी येणा-या अर्थसंकल्पात या प्रस्तावास
मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती श्रीमती
मुंडे यावेळी दिली. याशिवाय बचत
गटांच्या महिलांना बारा महीने बाजार उपलब्ध व्हावा याकरिता जिल्ह्यांच्या
ठीकाणी बचत गटांसाठी मॉल बनविण्यात येणार, महिलांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या
कौशल्याचा विकास करण्याकरिताही राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले.मुख्यमंत्री
ग्राम सडक योजने अंतर्गत बचत गटांनी गोळा केलेल्या प्लास्टीकचा वापर रस्ते
बांधणीसाठी करण्यात येणार आहे. सदर प्लास्टीक हे बचत गटांकडून
बाजार भावापेक्षा जास्त किमतीने शासन खरेदी करुन रस्ते बांधणीसाठी वापरणार आहे.
यामुळे पर्यावरणाचे संव र्धन व बचत गटांना आर्थिक दृष्ट्या सक्षम
करणे सहज शक्य होणार आहे, असे ही श्रीमती मुंडे यावेळी
म्हणाल्या. गुजरातच्या मुख्यमंत्री श्रीमती आनंदीबेन पटेल
यांनी ही त्यांच्या भाषणात बचत गटांकडून प्लास्टीक खरेदी करण्याच्या कल्पनेचा
उल्लेख करुन श्रीमती मुंडे यांचे यावेळी कौतुक केले.
महिला एकाच वेळी अनेक गोष्टी सहज
हाताळतात त्यांच्या याच गुणांला बळकट कराण्याचा राज्यशासनाचा उद्देश असल्याचेही
त्या म्हणाल्या. त्याकरिता शेतीसह जोड व्यवसाय
करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम राज्य शासन करेल.
राज्यात दृष्काळावर मात
करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ योजना सुरू केली असून त्यात
महिलांचा अभूतपुर्व सहभाग असल्याची नोदं त्यांनी यावेळी घेतली. 1500 कोटी रूपयांमध्ये 24 टी.एम.सी पाणी साठवले असल्याची माहिती
त्यांनी यावेळी दिली.
माझी कन्या भाग्यश्री या
योजनेकरिता राज्यशासनाने 300 कोटी रूपयें दिलेले आहेत. यासह कन्या
भ्रुण हत्या थांबविण्याकरिता राज्यशासन जोमाने काम करत असल्याचीही माहितीही श्री मुंडे
यांनी यावेळी दिली.
00000
No comments:
Post a Comment