Wednesday, 20 April 2016

परदेशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची परिचय केंद्राला भेट

  
नवी दिल्ली, २० : ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशनचे दक्षिण आशियाचे ब्युरोचिफ जेम्स बेनेट आणि निर्माते कुनाल सेहगल यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.

परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी दिली. कार्यालयाच्या ट्वीटर हँडल, फेसबुक, ब्लॉग, गुगलप्लस, एस.एम.एस सेवा, युटयुब अकाउंटच्या माध्यमातून देण्यात येणा-या बातम्या व महत्वाच्या माहितीच्या उपक्रमाबाबतही श्री. कांबळे यांनी यावेळी माहिती दिली. आधुनिक माध्यमांच्या युगात कार्यालयाने चालविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत जेम्स बेनेट व कुनाल सेहगल यांनी व्यक्त केले. या प्रसंगी जेम्स बेनेट व कुनाल सेहगल यांना महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली.  

                                                                           ******

No comments:

Post a Comment