योगेश कुंबेजकर(महाराष्ट्रातून प्रथम आणि देशात आठवा)
नवी
दिल्ली दि. 10 :
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल आज जाहीर झाला. देशातील 1 हजार 78 उमेदवार यात
यशस्वी ठरले. यामध्ये 100 हून अधिक मराठी
उमदेवारांनी यश संपादन केले आहे.
आज जाहिर झालेल्या निकालात केंद्रीय लोकसेवा
आयोगाने 1 हजार 78 उमेदवारांची नियुक्तीसाठी
शिफारस केली आहे. यामध्ये सर्वसाधारण
(ओपन)गटातून 499, इतर मागास प्रवर्गातून 314, अनूसूचित जाती प्रवर्गातून 176, अनूसूचित जमाती
प्रवर्गातून 89 इतक्या उमेदवांराचा समावेश
आहे. एकूण यशस्वी उमेदवांरापैकी 52 उमेदवार शारीरिक विकलांग आहेत. लोकसेवा आयोगाने
172 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve list) तयार केली आहे. यामध्ये सर्व साधारण गट 86 इतर मागास, इतर मागास वर्ग 74, अनुसूचित जाती 8
अनुसूचित जमाती 04 उमेदवारांचा समावेश आहे.
महाराष्ट्रतून 100 उमेदवार यशस्वी ठरले
आहेत. यामध्ये राज्यातील सोलापूर जिल्हयातील माढा तालुक्यातील कुंभेज येथील योगेश
कुंबेजकर यांनी यावर्षी देशात 8 वा क्रमांक मिळवला आहे. तर महाराष्टातून पहिला येण्याचा मानही त्यांनी मिळविला आहे. त्यांनी 2014 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 143
क्रमांक पटकावला होता. त्यावेळी त्यांना भारतीय पोलीस सेवेत नियुक्ती मिळाली होती.
सध्या ते हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेत आहेत. योगेश कुंबेजकर यांनी आय.आय.टी.
मुंबईमधून बी.टेकची पदवी संपादन केली आहे. कुंबेजकर यांच्यासह श्रीकांतनाथ पांचाळ देशातून 16 व्या क्रमांकावर,
हनुमंत झेंडगे 50 क्रमांकावर आलेले आहेत.
रिक्त जागेंपैकी शासनातील सेवेमध्ये खालीलप्रमाणे नियुक्ती
करण्यात येणार आहे.
भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.)
- या सेवेत सर्वसाधारण गट (ओपन) 91 इतर मागास
वर्ग (ओ.बी.सी.) 49, अनुसूचित जाती (एस.सी.) 27 , अनुसूचित जमाती (एस.टी.) 13 जागा
रिक्त आहेत. गुणाणूक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केला जाणार आहे.
भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.)
- या सेवेत शासनाकडे एकूण 45 जागा रिक्त आहेत. यामध्ये
सर्वसाधारण गट (ओपन) 25, इतर इतर मागास वर्ग (ओ.बी.सी)07 अनुसूचित जाती (एस.सी.)07,
अनुसूचित जमाती (एस.सी.) निरंक जागा रिक्त आहेत.
भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.)
- या
सेवेमध्ये एकूण 150 जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटातून (ओपन)77 उमेदवार, इतर
मागास प्रवर्गातून 37, अनुसूचित जाती प्रवर्गातून 23, अनुसूचित जमाती प्रवर्गातून 13
उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.
केंद्रीय सेवा गट ‘अ’ – या सेवेमध्ये एकूण 728
जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटातून (ओपन)369, उमेदवार, इतर मागास
प्रवर्गातून 196, अनुसूचित जाती
प्रवर्गातून 104, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून 56 उमेदवारांना नियुक्ती दिली
जाईल.
केंद्रीय सेवा गट ‘ब’ – या सेवेमध्ये एकूण 61
जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटातून (ओपन) 20, उमेदवार, इतर मागास
प्रवर्गातून 19, अनुसूचित जाती प्रवर्गातून 15 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून 07 उमेदवारांना
नियुक्ती दिली जाईल.
या परीक्षेत यश मिळवीणा-या महाराष्ट्रातील
उमेदवारांमध्ये योगेश कुंबेजकर 8, श्रीकांतनाथ पांचाळ 16, हनुमंत
झेंडगे 50, विशु महाजन 70, निखिल पाठक 107, सिद्धेश्वर बोंडार 124, स्वप्नील
वानखडे 132, रोहण बोटरे 187, स्वप्नील खरे 197, राहुल पांडवे 200, नवनाथ गव्हाणे
220, हर्षल भोयर 233, मुकुल
कुलकर्णी 238, रोहित गोडके 257, अक्षय कोंडे 278, रवींद्र खटाळे
283, आशिष काटे 328, पंकज खंडागळे 340, अक्षय पाटील 344, कीशोर क्षिरसागर 353, संजीव चेथुले 354, शेख अंसर अहमद 361, दत्तात्रेय
शिंदे 377, विवेक भस्मे 395, श्रीकांत सुसे
400, रेहा जोशी 425, वासुद तोरसेकर
440, कपिल गाडे 455, शैली ढोले 448, सोमय मुंडे 476, संदीप भोसले 482, अमित मुंडे 485, स्वप्निल पुंडकर 487, शिबी गहरवार 489, अमित आसरे 490, अदिती वाळुंज 491, पुनम पाटे 497, तुषार वाघ 545, नंदकिशोर कलाल 549, मनिष नारनवरे
552, विशाल साकोरे 568, देवयानी हलके 576, शितल वाडी 580, प्रसाद
मेनकुंदळे 599, प्रवीण डोंगरे
601, आकाश वानखडे 603, किरणकुमार
जाधव 614, किरण शिंदे 618, ऋषिकेश
खिल्लारी 627, शरदचंद्र पवार
632, गोपाल चौधरी 635, कुलदीप सोनवणे
636, चंद्रकांत राठोड 537, विशाल नरवडे 640, अरविंद कुमार नामदेव 648, अवध किशोर पवार 657, पवन बनसोड 674 शशांक शेव्हरे
682 , श्रुती शेजोळे 690, स्वप्निल कोठवडे 693, राहुल तिरसे 705, विनोदकुमार येरणे 709, रामदास काळे 711, स्वप्नील महाजन 720, नितीश पाठोडे 723, रोहन आगवणे 735, समीर पाटील 746 , लक्ष्मीकांत
सुर्यवंशी 750, प्रांजल पाटील
773, संदीप साठे 775, विक्रम विरकर 784, जय वाघमारे 788, किशोर तांदळे 814, शुभम ठाकरे 817, ओमकारेश्वर
कांचनगिरे 820, संदीप पानदुले
826, भुषण भिरुड 829, संघमित्र
खोब्रागडे 832, योगेश पाटील 836, रामदास भिसे 851, स्वप्नील
चौधरी 862, राहुल गारूड 869, उदय खोमणे 885, सुर्यकांत पवार 886, निधी
बारड 887, प्रदीप मिरासे 896, शिवानंद सुर्वे 913, शिवम् धमणीकर 934, प्रवीण
गावस्कर 936, रोहीत कुमार भैसारे 941, अतुल कुमार टीरके 943, वैशाली धांडे 964,
अमोघ थोरात 966, गौरव मेश्राम 968, अजय खरडे 975, क्रांती खोब्रागडे 982, स्वाती
सुर्वे 1003, मामोनी डोले 1005, योगेश भरसाट 1013, संदीप पवार 1038, श्रीकांत
मंत्री 1048, राहूल माळी 1054, सुधीर जाखेरे 1059, स्नेहल भापकर 1062, विष्णू
अव्टी 1064, संदीप सोनावणे 1074, गोरखनाथ पाटील 1076 हे गुणवंत उमेदवार आहेत.
No comments:
Post a Comment