Monday, 16 May 2016

महाराष्ट्राला यावर्षी ‘नीट’ मधून सवलत मिळावी - विनोद तावडे




                                                                                  
                                        
नवी दिल्ली, १६ : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षेबाबत’(नीट) दिलेल्या निकालाचा पुनरविचार करून वर्ष २०१६ करिता राज्याला नीटमधून सवतल मिळावी,अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.  
            देशात नीट राबविण्याबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने बोलविण्यात आलेल्या बैठकीत श्री. तावडे सहभागी झाले होते. या बैठकीनंतर महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. तावडे यांनी ही माहिती दिली. 
            श्री तावडे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांना वैद्यकीय व दंत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीट परिक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय दिलेला आहे. हा निर्णय आम्हाला मान्य असून यावर्षी राज्यांच्या सीईटीच्या माध्यमातून वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेश करू देण्यात यावे, अशी मागणी या बैठकीत केली. सीईटीसाठी राज्यांचा अभ्यासक्रम वेगळा आहे व आता नीट परिक्षा देण्याची सक्ती झाल्याने बदलेला अभ्यासक्रम पाहता विद्यार्थ्यांसमोर समस्या निर्माण झाली आहे. देशातील विविध राज्यांनी आप-आपल्या सीईटी परिक्षा घेतल्या आहेत. महाराष्ट्रात तर कायदा पारीत करून खाजगी आणि सरकारी परिक्षा एकत्रच करून घेण्यात आल्या आहेत त्यामुळे अवैद्य प्रवेशांना आळा बसलेला आहे. राज्यातील विद्यार्थी मराठी आणि उर्दु माध्यमातून परिक्षा देतात तशी तरतूद नीट परिक्षा देताना नसल्याने मुलांची अडचण होणार आहे. थोडया फार फरकाने प्रत्येक राज्यांचीच ही स्थिती असल्याने  यावर्षी सीईटी प्रमाणे प्रवेश मिळावा. पुढील वर्षी सर्व राज्ये नीटच्या परिक्षेबाबत तयारी करतील अशी बाजू श्री. तावडे यांनी मांडली असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून गरज पडल्यास याबाबत केंद्र सरकारने अध्यादेश आणावा, अशी मागणी केल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले.
            या प्रश्नाबाबत रविवारी श्री. तावडे यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी, केंद्रीय नगर विकास मंत्री वैंकय्या नायडू , अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेऊन यावर्षी राज्यांच्या सीईटीनुसारच प्रवेश मिळावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.   
तत्पूर्वी आज सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थे(एम्स)च्या डॉ. रामलींगास्वामी सभागृहात सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी नड्डा होते. मंत्रालयाचे सचिव बी.पी.शर्मा, सह सचिव डॉ. . के. पांडा आणि विविध राज्यांचे आरोग्य मंत्री व वरिष्ठ अधिकारी  यावेळी उपस्थित होते. राज्याच्या वतीने  गृह विभागाचे प्रधान सचिव(अतिरीक्त कार्यभार वैद्यकीय शिक्षण) विजय सतबीर सिंह आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे उपस्थित होते. 
              नीट बाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ
                                                           जे.पी.नड्डा
            या बैठकीत विविध राज्यांचे मत ऐकून घेतल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी नीट बाबत निर्णय घेताना विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, आजच्या बैठकीत प्रामुख्याने तीन विषय पुढे आले आहेत. त्यात विविध राज्यांमधे वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेशासाठी राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेली व काही ठिकाणी घेण्यात येणा-या सामाईक प्रवेश परिक्षेबाबत (सीईटी), विविध राज्यांमधे असलेला अभ्यासक्रम व नीट परिक्षेचा अभयासक्रम याबाबत योग्य तोडगा काढणे, प्रादेशिक भाषांमधून नीट परिक्षा देता यावी या विषयांचा समावेश आहे. याविषयांना धरुन मंत्रालयाच्यावतीने उचित मार्ग काढण्यात येईल त्यासाठी राज्यांकडून सूचना मागवण्यात येतील असेही श्री. नड्डा यांनी या या बैठकीत सांगितले

                                                    ००००

No comments:

Post a Comment