Wednesday, 18 May 2016

महाराष्ट्राला पुढच्या दोन वर्षासाठी ‘नीट’ परीक्षेमधून सवलत मिळावी : मुख्यमंत्री

         
 

                               
नवी दिल्ली, 18: महाराष्ट्राला पुढच्या दोन वर्षासाठीनीटपरीक्षेमधून सवलत मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज त्यांच्या निवासी स्थानी झालेल्या बैठकीत केली.
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षे’ (नीट) बाबत दिलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांना याच वर्षापासून नीट परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. मात्र यामुळे राज्यातील  विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी  राज्याला पुढील दोन वर्षासाठीनीटपरीक्षेमधून सवलत मिळावी,  या मागणीसाठी मुख्यमंत्री श्री फडणवीस पंतप्रधान यांची नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील विद्यार्थ्यांचे होणा-या नुकसानीबाबत सवीस्तर माहिती दिली. यावर पंतप्रधान मोदी यांनी याबाबत सकारात्मक  आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्री यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना सांगितले.
सामईक प्रेवश परीक्षा (सीईटी) चा अभ्यासक्रम राज्याच्या अभ्यासक्रमावर आधारीत असल्यामुळे  महाराष्ट्रातील 80%  विद्यार्थ्यांना ही परिक्षा देणे सोयीचे आहे. ‘नीटपरीक्षेचा अभ्यासक्रम हा केंद्रीय माध्यमीक शिक्षा बोर्ड(सी.बी.एस..) च्या अभ्यासक्रमाच्या आधारीत असल्यामुळे राज्यातील शहरी तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना पुढील दोन महिण्यात होणा-यानीटपरीक्षाच्या  अभ्यास करण्याकरिता अपुरा वेळ आहे. इतक्या कमी कालावधीत नीटचा अभ्यासक्रम समजणे विद्यार्थ्यांना कठीण होईल. महाराष्ट्रात सीईटी कायदा पारीत करून खाजगी आणि सरकारी परिक्षा एकत्रच करून घेण्यात आल्या आहेत त्यामुळे अवैद्य प्रवेशांना आळा बसलेला आहे..


 यासह राज्य शासनालाही तयारी करिता दोन वर्षाचा किमान कालावधी मिळावा, अशी मागणी  मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान यांना बैठकीत केली.

No comments:

Post a Comment