Thursday, 12 May 2016

परिचारिका आरोग्य प्रणालीचा कणा : राष्ट्रपती




महाराष्ट्रातील 2 परीचारिकांना फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार
नवी दिल्ली  : परिचारिका आरोग्य प्रणालीचा कणा आहेत. आरोग्यांच्या सर्वच पैलुंवर जसे पोलीओ निर्मुलन, मिड वाइफ सेवा, सामुदायिक शिक्षण, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये परीचारीका महत्वपुर्ण भुमिका निभावतात, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आज येथे केले.
फ्लोरेंस नाइटिंगेल यांचा 12 मे हा जन्म दिवस अंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनात फ्लोरेंस नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रपती बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्रातील 2 परिचारिकांना फ्लोरेंस नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय कुंटूब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा उपस्थित या कार्यक्रमास होते. पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रूपयें रोख, पदक तथा प्रशस्ती पत्र असे आहे.

     यावेळी राष्ट्रपती म्हणाले, परीचारीकांचे समर्पण आणि सुश्रुशामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील जनता त्यांच्या कामाची प्रशंसा करतात. देशातील आरोग्य राखण्यासाठी परिचारिकांची महत्वपुर्ण भुमिका आहे. आरोग्य विभागाचे धोरण आखतांना परिचारिकांचे मत विचार घेतले पाहिजे, असे आवाहनही राष्ट्रपती यांनी यावेळी केले.
रूग्ण सेवेत उल्लेखनीय कार्य करणा-या महाराष्ट्रातील 2 परिचारिकांसह देशभरातील एकूण 35 परिचारिकांचा सन्मान राष्ट्रपतींच्या करण्यात आला.
यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड येथील जिल्हा उपविभागीय रूग्णालयात सहायक व्यवस्थापक म्हणून कार्य करणा-या मीरा किशोर परदेशी यांचा समावेश आहे. मागील तीस वर्षापासून त्या उत्कृष्ट रूग्ण सेविका म्हणून काम करीत आहेत. यापुर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र, मुख्य रूग्णालया,  कुटूंब कल्याण विभाग याठीकाणी त्यांनी काम केले आहे.
श्रीमती परदेशी यांनी व्यवस्थापन, संवाद शास्त्र, बाल मृत्यु रोखणे आणि सुरक्षीत मातृत्व, एच.आय.वी. / एड्स रोखण्याचे प्रशिक्षण, यासह जागतिक आरोग्य संस्थेतर्फे दिले जाणारे विगी-फ्लो चे प्रशिक्षणही त्यांनी घेतले आहे. त्यांना लिखाणाची आवड असून स्थानिक वर्तमान पत्रात त्यांनी आरोग्याविषयक लेखन केले आहे. 1985 मध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. याशिवाय राज्याच्या आरोग्य विभागातर्फेही त्यांना गौरविण्यात आलेले आहे.
श्रीमती ज्योती मुरलीधर भांगळे, या जळगाव जिल्ह्यातील तालुका जामनेर येथील  पालधी  या गावातील उपकेंद्रात ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (ए.एन.एम) आहेत. श्रीमती भांगळे अंत्यत दयाळू स्वभावाच्या असून पूर्ण तन्मयतेने रूग्णांची सेवा करतात. 2008 मध्ये श्रीमती भांगळे यांनी महिला आरोग्य कर्मचारी म्हणून प्रशिक्षण पुर्ण केल. यासह बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानात त्या जन जागृतीची कार्य करीत आहेत. त्यांनी मातामृत्यू दर रोखणे, बाल आरोग्य याबाबत विविध सेमीनार केले आहेत.  राज्यातील विविध संस्थेमार्फत त्यांना गौरविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment