Thursday 30 June 2016

औरंगाबाद-तलवाडी महामार्गाच्या चौपदरीकरणास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

                   
नवी दिल्ली दि. ३० : राज्यातील औरंगाबाद-तलवाडी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या चौपदरी करणाच्या कामास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.  
               पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठीत अर्थविषयक समितीने ही मंजुरी दिली. या मंजुरी नुसार औरंगाबाद –तलवाडी महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी करण्यात येणारे भूमी अधिग्रहण, पुनर्वसन आणि अन्य बाबींसाठी एकूण २०२८.९१ कोटी खर्च अपेक्षित आहे.या निर्णयामुळे राज्यातील पायाभूत सुविधांची बळकटी करण्यास मदत होणार असून या भागातील  नागरिकांच्या वेळेची व पैस्यांची बचत होणार आहे. 
राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेच्या(एनएचडीपी) चौथ्या टप्प्याअंतर्गत औरंगाबाद-तलवाडी या ८७ किलो मीटर महामार्गाचे चौपदीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याचे वित्त- नियोजन आणि बांधकाम हे बांधा -वापरा व हस्तांतरीत करा’(बीओटी)  तत्वावर होणार आहे. 
औरंगाबाद-तलवाडी महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील आणि या भागातील विकासाला चालना मिळेल. साधारणत: १ किलो मीटर रस्ता बांधण्यासाठी ४ हजार ७६ मजुरांची  गरज पडणार असल्याचे अनुमान आहे त्यानुसार, ३ लाख ५४ हजार ९० लोकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.      

                                           ००००००

No comments:

Post a Comment