Friday 1 July 2016

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी






नवी दिल्ली दि. १ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राज्यातील हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती  महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
 कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त भारती झाडे, डॉ. किरण कुलकर्णी, संजय आघाव, अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
 महाराष्ट्र परिचय केंद्रात वसंतराव नाईक यांना अभिवादन
 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार यांनी वसंतराव नाईक यांच्या योगदानाबाबत माहितीपर भाषणे दिली. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
         000000

No comments:

Post a Comment