नवी
दिल्ली, दि. 18 : राष्ट्रपतींकडून
राज्यसभेवर नामनिर्देशीत संभाजी राजे शाहु छत्रपती यांच्यासह महाराष्ट्रातून राज्यसभेवर
नवनियुक्त व फेरनियुक्त झालेल्या खासदारांनी आज राज्यसभेच्या सदस्य पदाची शपथ घेतली.
आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.
राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती महंमद हामीद अन्सारी यांनी संसदेचे वरिष्ठ
सभागृह राज्यसभेत राष्ट्रपतींनी नुकतेच राज्य सभेवर नेमणूक केलेले महाराष्ट्रातील
खासदार संभाजी राजे शाहु छत्रपती यांना सभागृहाचे सदस्य म्हणून पद व
गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्यासह सभागृहातील गणमान्य सदस्य यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रातून नव नियुक्त खासदार तथा माजी केंद्रीय
गृहमंत्री पी.चिदंबरम, डॉ. विनय सहस्त्रबुध्दे आणि प्रसिध्द नेत्रतज्ज्ञ पद्मश्री
डॉ. विकास महात्मे यांनी सभागृहाच्या सदस्य पदाची शपथ घेतली. खासदार संजय राऊत आणि
प्रफुल्ल पटेल यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर फेर नियुक्ती करण्यात आली असून
त्यांनीही सभागृह सदस्य पदाची शपथ घेतली.
संभाजी राजे शाहु छत्रपतींनी घेतले
महापुरुषांचे आशिर्वाद
राज्यसभेच्या
सदस्यपदाची शपथ घेतल्यानंतर संभाजी राजे शाहु छत्रपती यांनी संसद भवनाच्या आवारात
स्थित छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि छत्रपती शाहु महाराज आणि महात्मा गांधी
यांच्या प्रतिमेला वंदन करून आशिर्वाद
घेतले. यावेळी संभाजी राजे शाहु छत्रपती यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
No comments:
Post a Comment