नवी
दिल्ली दि. २० : अहमदनगर
जिल्हयाचे खासदार दिलीप गांधी यांनी आज
महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.
परिचय
केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. गांधी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
केले. यावेळी श्री. कांबळे यांनी महाराष्ट्र
परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात
येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची
माहिती दिली. श्री.गांधी यांना महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात
देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना श्री.
गांधी यांनी भेट देऊन माहिती घेतली .
000000
No comments:
Post a Comment