Friday, 1 July 2016

वृक्ष लागवड ; शासनाचा प्रेरक उपक्रम - निवासी आयुक्त आभा शुक्ला











 
नवी दिल्ली, ०१ जुलै : वृक्ष लागवड शासनाचा प्रेरक उपक्रम असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी सदनात वृक्ष लागवड करते वेळी केले.
कस्तुरबा मार्ग स्थित व कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात वृक्ष लागवड करण्यात आली.त्यावेळी आभा शुक्ला म्हणाल्या, प्रदूषण मुक्त जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने वृक्षरोपण केल पाहिजे.  या उपक्रमात सर्वांनी सहभाग  घ्यावा.  दोन्ही सदनात मिळून एकूण १५० रोपटे लावण्यात आली.  यामध्ये जांभुळ, आवळा, अखरोट, गुलमोहर, कडुनींब, आंबा, पाम, अल्तमश अशी विविध रोपटे लावण्यात आली. 
निवासी आयुक्त यांनी सर्वच अधिकारी व कर्मचा-यांना स्वत: वृक्षारोपण करुन स्वंयसेवक म्हणून या उपक्रमात सहभागी होण्याचे तसेच वृक्षारोपणानंतर त्या वृक्षाचे पालकत्व स्वीकारण्याचे  आवाहन केले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने वनमहोत्सव सप्ताहाचे औचित्य साधून आजपासून राज्यभरात २ कोटी वृक्ष लागवड करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत्‍ वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि वन विभाग महामंडळाच्यावतीने  .५० कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. उर्वरित ५० लाख वृक्ष लागवड ही शासकीय,  निमशासकीय कार्यालये, शाळा,मैदाने,पटांगणे आदी  ठिकाणी करण्यात येणार आहे.
यावेळी निवासी आयुक्त राजशिष्ट्राचार, तथा गुंतवणूक आयुक्त  लोकेश चंद्र तथा अपर निवासी आयुक्त समीर सहाय, निवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, भारती झाडे, राजीव मलिक, संजय आघाव, अजितसिंग नेगी यांच्या सह महाराष्ट्र सदन तसचे महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                        महाराष्ट्र परिचय केंद्रात वृक्षारोपण
1 जुलै या दिवसापासून राज्यभरात वृक्ष लागवड करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र परिचय केंद्रातही वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  आले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर कांबळे यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी वृक्षारोपण केले. 
00000000

No comments:

Post a Comment