Thursday, 21 July 2016

सर्वाधिक ध्वज दिन निधी संकलनासाठी महाराष्ट्र पुरस्कृत










नवी दिल्ली ,21 :  ध्वज दिन निधी संकलनासाठी महाराष्ट्राने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर  यांच्या हस्ते महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राज्याचे कौशल्य विकास तसेच माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील यांनी स्वीकारला.
येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय सैनिक बोर्डाची 30 वी बैठक झाली. यावेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे अन्य वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्याच्यावतीने मंत्री  श्री पाटील, सचिव श्यामलाल  गोयल, केंद्रीय सैनिक बोर्ड महाराष्ट्राचे संचालक कर्नल सुहास जतकर उपस्थित होते.
राज्याने 2015-16 या वर्षांमध्ये सर्वाधिक 28 कोटी पेक्षा जास्त  ध्वज दिन निधी संकलीत केला. हा निधी संकलीत करण्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षम नेतृत्वात आखलेलया योजनेमुळे हे ध्येय साध्य होऊ शकले, अशी प्रतिक्रीया श्री पाटील यांनी दिली.
केंद्रीय सैनिक बोर्डाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये राज्याच्या वतीने उचलण्यात आलेल्या अनेक सकारात्मक पाऊलांची माहिती श्री पाटील यांनी दिली.  ध्वज दिनी निधी उभारण्यासाठी राज्यशासनातर्फे  सामाजिक माध्यम तसेच मुद्रीत माध्यमाव्दारे करण्यात आलेल्या जनजागृतींची माहिती दिली. राज्य शासनाव्दारे ध्व्ज दिन निधी हा  ई-निधीच्या स्वरूपातही उभारला जातो, असे श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्यात माजी सैनिकांना इतर सेवेंमध्ये 15 टक्के आरक्षण दिले जाते. जे इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. माजी सैनिकांमध्ये क्षमता आहे मात्र त्यांचे क्षेत्र हे संरक्षणसंदर्भातील असते. अशा सैनिकांना  सेवानिवृत्तीच्या एक ते दोन वर्षा पुर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अथवा इतर कौशल्य विकासाचे दूरस्थ प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामुळे सैनिक निवृत्तीनंतर मुख्यप्रवाहात सहज येतात अशी, माहिती बैठकीत दिली.
राज्यातील जवळपास सर्वच जिल्हयात सैनिक संकुल, उघडण्याबाबत राज्यशासनातर्फे जमीन देण्यात आलेली आहे. राज्यात काही ठिकाणी बांधकाम पुर्ण झाले आहेत तर काही ठिकाणी बांधकाम लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती श्री पाटील यांनी बैठकीत दिली.


कौशल्य विकासाचे पश्चिम केंद्र  नागपूरमध्ये होणार
कोशल्य विकासाचे पश्चिम केंद्र नागपूरमध्ये होणार असल्याचे माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री  संभाजी निलंगेकर-पाटील यांनी  आज महाराष्ट्र सदन येथे ओयोजित  पत्रकार परीषदेत दिली.
            पश्चिम केंद्रामध्ये महाराष्ट्र, गुजरात,   मध्य प्रदेश, या राज्यांचा तसेच दमण व दिव, दादरा नगर हवेली या केंद्र शासीत प्रदेशांचा  या राज्यांचा समावेश  असणार आहे.




No comments:

Post a Comment