नवी दिल्ली दि. २१ : कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात येत असून त्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम आखण्यात आला आहे,अशी माहिती राज्याचे कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास आणि माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
राज्याचे कॅबीनेट मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर श्री. पाटील यांनी आज विज्ञानभवात आयोजित कार्यक्रमात सर्वात जास्त ध्वज दिवस निधी जमा केल्याबद्दल राज्याला मिळालेला प्रथम पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमानंतर त्यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात श्री. पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. पाटील यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
श्री. पाटील म्हणाले, राज्यात मोठया प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध आहे मात्र प्रशिक्षित मनुष्यबळाची कमरता आहे. कृषी, वाहन उद्योग, बांधकाम व्यवसाय, वाहतूक आणि आरोग्य इत्यादी क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने विविध कार्यक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी राज्यातील औद्यागिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय)मध्ये प्रवेशासाठी विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. आयटीआय मध्ये जागांच्या तुलनेत आलेले अधिक अर्ज लक्षात घेता पुढील काळात आयटीआयची संख्या वाढविणे तसेच दिवसातून वेग-वेगळया वेळांमध्ये आयटीआय चालविण्या संदर्भातही विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग समुहांच्या मागणीनुसार आयटीआय सोबत थेट करार करून त्यांना आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पुण्यात फॉक्सवॅगन कंपनीसोबत बोलणी झाली आहे. ही कंपनी आता पिंपरी चिंचवड येथील आयटीआ मध्ये प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करणार आणि त्यांना आपल्या कंपनीत रोजगार देणार आहे.
टाटा आणि वाधवानी उद्योग समुहांच्या समन्वयातून राज्यातील आयटीआयमध्ये १०० व्हर्चुअल क्लास रुम सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माजी सैनिक कल्याण विभागाच्या माध्यमातून माजी सैनिकांसाठी कौशल्य विकास अभ्यासक्रम तयार करणार असल्याचे श्री. पाटील म्हणाले .
परिचय केंद्र ; महाराष्ट्रासाठी कार्य करणारे आणि देशासाठी समर्पित कार्यालय
महाराष्ट्र परिचय केंद्र हे महाराष्ट्रासाठी कार्य करणारे आणि देशासाठी समर्पित कार्यालय असल्याचे गौरवोदगार श्री. पाटील यांनी काढले. या कार्यालयाच्या वैविध्यपूर्ण कार्याचे कौतुक करत परिचय केंद्र हे देशाच्या राजधानीत महाराष्ट्रासाठी कार्य करणारे देशसमर्पित कार्यालय असल्याचे ते म्हणाले .
श्री. कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती दिली. श्री. पाटील यांना महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना त्यांनी भेट देऊन माहिती घेतली .

No comments:
Post a Comment