Monday 25 July 2016

राष्ट्रपती भवनात नवीन हायटेक संग्रहालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन






नवी दिल्ली, 25 :  राष्ट्रपती भवनातील परिसरात नवीन हायटेक संग्रहालयाचे उदघाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी राष्ट्रपती प्रतीभा देवीसिंह पाटील, उपराष्ट्रपती महमंद हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्यासह केंद्रीय मंत्री व गणमान्य उपस्थित होते.
        उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान म्हणाले, इतिहास, कला, संस्कृती यांचे अद्यावत तंत्रज्ञानाच्या सहायाने चित्रण करून हे संग्रहालय बनविण्यात आले आहे. संग्रहालय बनवितांना शास्त्रोक्त पद्धतीचा उपयोग करण्यात आला आहे. या माध्यमातून इतिहासाला पुनर्जीवीत करण्यात आले असून हे संग्रहालय भारतीयांसाठी दिशा दर्शक ठरेल, असे गौरवोदगार त्यांनी यावेळी काढले. राष्ट्रापतींनी हे संग्रहालय उभारण्यासाठी  घेतलेल्या पुढाकाराबद्दल श्री मोदी यांनी श्री मुखर्जी यांचे अभिनंदन करून राष्ट्रपती पदाची चार वर्षे आज पूर्ण झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
8 ऑक्टोंबर 2014 ला 88 वर्ष पूर्ण झालेल्या राष्ट्रपती भवनाच्या दुस-या टप्प्यातील संग्रहरलयाचा पाया ठेवण्यात आला होता. या संग्रहालयाचे क्युरेटर सरोज घोष हे आहेत.
हे अत्याधुनिक संग्रहालय 10,000 वर्ग मीटर क्षेत्रफळामध्ये बांधलेले आहे. यामध्ये आतापर्यंतच्या राष्ट्रपतींना मिळालेल्या अनमोल भेट वस्तू ठेवलेल्या आहेत. या संग्रहालयाचा प्रथम टप्पा ऑगस्ट 2014 मध्ये जनतेसाठी खुला करण्यात आला. विविध मौल्‌यवान वस्तू, चित्र, ऐतिहासिक दस्ताऐवज दर्शविण्यात आले आहेत.
या संग्रहालयात राष्ट्रपती भवनाचा इतिहास, ब्रिटिश व्हाईसराय, स्वातंत्र्य आंदोलनाचे मुख्य टप्पे,  भारतीय गणराज्याची स्थापना, संविधान निर्मिती, आतापर्यंतच्या 13 राष्ट्रपतींचा जीवन परीचय, त्यांची  कार्यशैली, महत्वपूर्ण अतिथींची माहिती, राष्ट्रपती भवनाचा परीसर,  आजुबाजूचे वातावरण, तीथे काम करणारे लोक या सर्वाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment