नवी दिल्ली दि. ०५ : ‘मी, एक सामान्य कार्यकर्ता असून केंद्रीय
मंत्रिमंडळात मिळालेल्या जबाबदारीचा उपयोग
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालून जनतेच्या हितासाठीच करेल’ असे मत नवनियुक्त
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
राष्ट्रपती भवनात आज केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ
घेतल्यानंतर महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. आठवले
म्हणाले, मी एका सामान्य कुटुंबातून आलो आहे
व सामान्य कार्यकर्ता आहे. डॉ. आंबेडकरांमुळेच आपल्याला हा बहुमान मिळाला
असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्याकडे ज्या मंत्रालयाचा कार्यभार
सोपविण्यात येईल त्याचा चोख व उत्तम कारभार सांभाळण्यावर आपला भर असेल. आपल्याला मिळालेल्या
मंत्रिपदाचा उपयोग बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज घडविण्यासाठी करेल असे
सांगतानाच सर्व जाती-जमातींच्या जनतेला आपल्या मंत्रालयाच्यावतीने शक्य ती मदत केली
जाईल अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
00000
No comments:
Post a Comment