नवी दिल्ली दि. ०६ : रिपब्लीकन पक्षाचे(आठवले गट) नेते तथा राज्यसभेचे खासदार रामदास आठवले यांनी बुधवारी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. तर धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी संरक्षण राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला.
शास्त्री भवन स्थित सामाजिक न्याय मंत्रालयात केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहेलोत यांनी रामदास आठवले यांना मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून पदभार सोपवला. यावेळी श्री. आठवले यांच्या पत्नी सिमा आठवले आणि मुलगा जीत आठवले उपस्थित होते.
यावेळी श्री. गहेलोत आणि श्री आठवले यांनी देशात सामाजिक समरसता स्थापीत करण्यासाठी आपण परस्पर सहकार्य व समन्वयाने कार्य करू अशी ग्वाही दिली.
साऊथ ब्लॉक स्थित संरक्षण मंत्रालयात खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज संरक्षण राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment