नवी दिल्ली, 22 : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2016 ची घोषणा आज झाली. महाराष्ट्राच्या
धावपटू ललीता बाबर आणि क्रिकेटर अजिंक्य राहाणे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर
करण्यात आला. यासह राजेंद्र शेळके यांना ध्यानचंद तर दादर पारसी झोरोस्ट्रेन
क्रिकेट कल्ब यांना राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे
वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवन येथे होणार आहे.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण
मंत्रालयाच्यावतीने पुरस्कार जाहीर करण्यात येतात. क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च
मानला जाणारा राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कारासाठी यंदा चार खेळाडूंचे नावे जाहीर
झाले आहेत. यामध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये बंडमिंटनसाठी रजत पदक पटकावणारी पी.वी सिंधू,
कुस्तीमध्ये कांस्य पदक पटकावणारी साक्षी
मलिक तसेच जिमनॉस्टीकमध्ये चमकदार कामगिरी करणारी दिपा कर्माकर, शुटींग खेळाडू
जितु राय यांचा समावेश आहे. सलग चार वर्ष उत्कृष्ट कामगिरी करणा-या खेळाडूंना हा
पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्काराचे स्वरूप 7.5 लाख रूपये रोख असे आहे.
द्रोणाचार्य पुरस्कारासाठी 6
गुरूंची निवड
द्रोणाचार्य पुरस्कारासाठी रमेश
नागापूरी यांना एथलेटिक्ससाठी, सागार माल धायल यांना मुष्ठियुद्धसाठी, राज कुमार शर्मा यांना क्रिकेटसाठी,
श्री बिश्चेश्वर नंदी यांना जिमनॉस्टीक, श्री प्रदीप कुमार यांना तैराकीसाठी
(जीवनगौरव), महाबीर सिंग यांना कुस्तीसाठी (जीवनगौरव) हा पुरस्कार प्रदान केला
जाईल. द्रोणाचार्य पुरस्कार हा उत्कृष्ट खेळाडू घडविणा-या शिक्षकांना जाहीर केला
जातो. पुरस्काराचे स्वरूप द्रोणाचार्य यांची प्रतिमा,
प्रमाणपत्र आणि 5 लाख रूपये रोख असे आहे.
अर्जुन पुरस्कासाठी 15 खेळाडूंची
नावे जाहीर
अर्जुन पुरस्कारसाठी तिरंदाजी
खेळाडू रजत चव्हाण, धावपटू ललिता बाबर, बिलियर्ड्स
आणि स्नूकर खेळाडू सौरव कोठारी, मुष्ठियुद्ध खेळाडू शिवा थापा, क्रिकेटर अजिंक्य
राहाणे, फुटबॉलपटू सुब्राता पॉल, हॉकीपटू राणी व वी.आर. रंगनाथ, नेमबाजीसाठी
गुरप्रीत सिंग व अपुर्वी चंदेला, टेबल टेनिससाठी सौम्याजित घोष, कुस्तीसाठी विनेश
व अमित कुमार, पॅरा ऐथलेटिक्ससाठी संदीपकुमार सिंग मान व कुस्तीसाठी विरेंद्र सिंग(कर्णबधीर)
यांची नावे जाहीर. जे खेळाडू सलग चार वर्षे उत्तम कामगिरी करतात त्यांना हा
पुरस्कार प्रदान केला जातो. पुरस्काराचे स्वरूप अर्जुनाची प्रतिमा, प्रमाणपत्र आणि
5 लाख रूपये रोख असे आहे.
ध्यानचंद पुरस्कार वर्ष 2015 साठी
3 खेळाडूंची निवड
ध्यानचंद पुरस्कार 2015 साठी
एथलेटिक्स सत्ती गीथा, हॉकीपटू सिल्वॉनस डंग डंग,
राजेंद्र प्रल्हाद शेळके यांना रोंइगसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. एखादया
खेळासाठी संपूर्ण जीवन वाहीलेल्या खेळाडूंना हा पुरस्कार बहाल केला जातो. या
पुरस्काराचे स्वरूप ध्यानचंद यांची प्रतिमा प्रमाणपत्र आणि 5 लाख रूपये रोख असे
आहे.
राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन
पुरस्कारांसाठी 4 संस्थाची निवड
तरूण पिढीला खेळाकडे आकृष्ट
करण्यासाठी विविध संस्थाना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार प्रदान केले जातात.
वर्ष 2016 साठी हॉकी सिटीझन ग्रुप, दादर पारसी झोरोस्ट्रेंन क्रिकेट कल्ब, उषा स्कूल ऑफ ऐथलिटिक्स, स्टाईरस, यांना जाहीर
झाला आहेत. इंडियन इनफ्रास्ट्रक्चर फायनांन्स लीमीटेड या कंपनीला क्रीडा क्षेत्रात
केलेल्या उल्लेखनिय कामासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. रिर्झव बँक ऑफ इंडियाला
कर्मचां-याना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन तसेच क्रीडा कल्याणकारी योजना
राबविण्यासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सुब्रोतो
मुखर्जी क्रीडा शिक्षण संस्थालाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये
पुरस्काराचे स्वरूप चषक तसेच प्रमाणपत्र प्रदान केले
जाईल.
मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी
वर्ष 2015-16 साठी पंजाब विद्यापीठ पतीयाळा यांना जाहीर झाला आहे. आंतर विद्यापीठ
क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी करणा-यांना विद्यापीठाला हा पुरस्कार दिला जातो.
पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रूपये रोख आणि प्रमाणपत्र असे आहे.
No comments:
Post a Comment