नवी दिल्ली, 18 : महाराष्ट्राच्या “आजादी से आजादी तक- एक बुलंद नारा” या देशभक्तीपर कार्यक्रमाने ‘भारत पर्व’ प्रदर्शनाचा आज समारोप झाला. प्रदर्शन काळात महाराष्ट्र दालनास जवळपास 4० हजाराहून अधिक पर्यटक व ग्राहकांनी भेट दिली. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने 70 व्या स्वतंत्र दिनानिमित्त राजपथ लॉनवर दिनांक १२ ते १८ ऑगस्ट या कालावधित “भारत पर्व” प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. आज सुभाष नकाशे यांच्या दिग्दर्शनाखालील राज्यातील 300 कलाकारांचा सहभाग असणा-या “आजादी से आजादी तक- एक बुलंद नारा” या देशभक्तीपर कार्यक्रमाने या प्रदर्शनाचा समारोप झाला. यावेळी केंद्रीय नगर विकास, माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्यानायडू, पर्यटन व सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा, माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन सिंह राठोड आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे उपस्थित होते.
विविध हस्तकला, खाद्य पदार्थ आणि विविध क्षेत्रातील उपलब्धी दर्शविणारी राज्यांची तीन दालने या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली.राज्याचा विविध क्षेत्रातील विकास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दर्शविणा-या डिजीटल दालनाला उदंड प्रतिसाद मिळाला . याठिकाणी ‘मेकइन महाराष्ट्रा’च्या माध्यमातून राज्यात झालेली गुंतवणूक व विकास हे आकर्षक पॅनलच्या माध्यमातून दर्शविण्यात आले. महात्मा ज्योतीबा फुले,छत्रपती शाहु महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांचे देश विकासातील योगदान, आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासह लोकमान्य टिळक आणि स्वातंतत्र्यवीर दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान,कला, संस्कृती आदींमध्ये राज्याचे योगदान हे आकर्षक पॅनलच्या माध्यमांतून येथे भेट देणा-यांपर्यंत पोहचविण्या आले. ‘व्हर्च्यअलटुरीजम’च्या माध्यमातून शिर्डी येथील साई बाबा मंदीर, बीबी का मकबरा,अंजीठा-वेरूळ लेण्या आणि तारकर्ली समुद्र किना-याची सफरघडविण्यात आली. अन्य एका एलइडीवर ‘फेस रिकग्नेशन तंत्रज्ञाना’च्या माध्यमातून पुणेरी पगडी, महाराष्ट्राचा फेटा परिधान करण्याचा आनंदयेथे येणा-या प्रेक्षकांनी घेतला. या दालनास भेट देणा-या शाळकरी , महाविद्यालयीन मुलांनी पझल गेमच्या माध्यमातून लोकमान्य टिळक,छत्रपती शाहू महाराज आदी महा पुरूषांचे चित्र जोडून या महापुरुषांविषयी जाणून घेतले. ‘ऑगमेटीक रियॅलीटी’ या तंत्रज्ञानाचा प्रयोग करूनराज्यातील ताडोबा अभयारण्यात वाघाला कुरवाळण्याचा अनुभव येथे मिळाला.

राज्यातील हस्तकला दर्शविणारे दालनही येथे उभारण्यात आले. यात राज्यातील ७ लघु उद्योजकांनी सहभाग घेतला. पैठणीसाडया, वारली पेटींग, लाखाच्या बांगडया, कोल्हापूरी चपला, हुपरी ज्वेलरी, आयुर्वेदिक साबण , पॅच वर्क, सतार आदी वस्तुंचे स्टॉल येथे लावण्यात आले. प्रदर्शनासोबतच या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या, मोठया प्रमाणा वस्तूंची विक्री झाल्याले लघु उद्योजकांनी समाधान व्यक्त केले.
खाद्य दालनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लज्जतदार व्यंजनही येथे येणा-या प्रेक्षकांना चाखता आली. पुरण पोळी, साबुदाना खिचडी,साबुदाना वडा, पीठल भाकरी, भरली वांगी, वडा पाव, मिसळ पाव आदी मराठमोडया व्यंजनाचा खवय्ये ग्राहकांनी मनमुराद आनंद घेतला.
महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंकाच्या स्टॉल ला उदंड प्रतिसाद
डिजीटल दालनात महाराष्ट्र अहेड व लोकराज्य या महाराष्ट्र शासनाच्या मुखपत्राचा स्टॉल लावण्यात आला. केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा आणि संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी या स्टॉलची आवर्जून पाहणी केली. लोकराज्य आणि महाराष्ट्र अहेड या अंकाच्या मांडणीचे त्यांनी कौतुक केले. महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंक त्यांना भेट स्वरूपात देण्यात आला. प्रदर्शन काळात विविध क्षेत्रात कार्यरत अधिकारी, महाविद्यालयीन आणि स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या तरूणांचा या स्टॉल ला मोठा प्रतिसाद मिळाला. स्टॉल वर भेट देणा-यांना महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंक त्यांना भेट स्वरूपात देण्यात आला.
No comments:
Post a Comment