नवी
दिल्ली दि. 04 : दिल्ली अभ्यास दौ-यावर असणा-या सिंधुदूर्ग जिल्हयातील
पत्रकारांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.
परिचय
केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे आणि माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी या
पत्रकारांचे पुष्प देऊन स्वागत केले.यावेळी छोटेखानी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले.
पत्रकार दौ-याचे समन्वयक तथा सिंधुदूर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मिलींद
बांदिवडेकर यांनी प्रास्ताविकात दिल्ली अभ्यास दौ-या मागील भूमिका स्पष्ट केली.
यावेळी श्री.
कांबळे यांनी परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम,
प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने, दिल्लीसह अन्य राज्यातील महाराष्ट्र
मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय याबाबत माहिती दिली. कार्यालयाची एसएमएस सेवा आणि
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार माध्यमांना देण्यात येणारी माहिती व साधण्यात
येणारा समन्वय आदींची माहिती दिली.
यावेळी मुक्त पत्रकार अनिल जोशी यांनी ‘दिल्लीतील पत्रकारीता’ या विषयावर माहिती दिली. राज्यातील
वर्तमानपत्र, वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून काम करताना संबंधित वृत्तपत्र किंवा
वृत्तवाहिनी व वाचकांच्या आणि दर्शकांची अभिरूची लक्षात घेऊन करावे लागणारे
वार्तांकन, वार्तांकनासाठी विविध क्षेत्राचा असावा लागणारा अभ्यास व त्याचा उचित
उपयोग याबाबत त्यांनी माहिती दिली.
दैनिक पुढारीच्या सिंधुदूर्ग आवृत्तीचे प्रमुख गणेश जेठे
यांनी आभार प्रदर्शन केले. परिचय केंद्रात आल्यावर दिल्लीतील महाराष्ट्राची माहिती
कळली अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित पत्रकारांना
महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे
ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन या पत्रकारांनी माहिती घेतली .
000000
No comments:
Post a Comment