नवी दिल्ली, 5: महाराष्ट्रातील 29 शिक्षकांना आज राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याहस्ते
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात
आले.
येथील विज्ञान
भवनात केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्यावतीने ‘शिक्षक दिना’निमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश
जावडेकर, उच्च शिक्षण राज्यमंत्री डॉ. महेंद्र पांडे, शालेय शिक्षण राज्यमंत्री
उपेंद्र कुशवाह, शालेय शिक्षण सचिव सुभाष चंद्र खुटिया उपस्थीत होते.
भारताचे दुसरे
राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षक
पुरस्काराचे वितरण करण्यात येते. या पुरस्कारांची सुरूवात 1958 पासून करण्यात आली.
यावर्षी देशभरातील एकूण 378 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र, 50 हजार रूपयें रोख असे आहे.
महाराष्ट्रातील एकूण 29 शिक्षकांना राष्ट्रीय
शिक्षक पुरस्कार - 2015 प्रदान करण्यात आले. यामध्ये 20 प्राथमिक शिक्षकांपैकी 2 शिक्षक हे विशेष श्रेणीचे आहेत. 9 माध्यमिक शिक्षकांपैकी 1 शिक्षक हे विशेष श्रेणीचे आहेत.
20 प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय
पुरस्कार प्रदान
शर्मीला मोहन पवार, जिल्हा परीषद प्राथमिक
विद्यालय, कुसेलवाडी, (शिराळा), सुदाम ईश्वर होळमुखे,
जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय (कडेगांव), अनिल देवदन मोहिते जिल्हा परीषद प्राथमिक
विद्यालय क्रमांक 3 इमानधामनी (मिरज ),
श्री संजीव पांडूरंग चौगूले, श्रीमती एम.डी. बर्वे प्राथमिक विद्यालय,अभयनगर
(मिरज) हे सर्व शिक्षक सांगली जिल्ह्यातील आहेत.
संभाजी
गोंविद पाटील, केंद्रीय विद्यालय, दाजीपूर, (राधानगरी), विमल गुंडूराव चौगुले,
श्री शंकर लींग विद्या मंदिर, मदीलागे,अजरा, सुहास अर्जुन शिंतरे, जीवन शिक्षण
विद्या मंदीर, वदरागे, (गडहिंग्लज) सर्व शिक्षक कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
दत्तात्रे बबनराव वारे, जिल्हा परीषद प्राथमिक
विद्यालय, वाबळेवाडी, (शिरूळ), सोमनाथ पांडूरंग म्हेत्रे, जिल्हा परीषद प्राथमीक
शाळा, संगरूण हवेली, शिवाजी दत्तू सोनावणे, जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय,
नंदेलावले मुळशी, हनुमंत श्रीरंग जाधव जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय कातेवाडी,
बारामती सर्व शिक्षक हे पुणे जिल्ह्यातील आहेत.
विशेष श्रेणी अंतर्गत पुरस्कार प्राप्त
शिक्षकांमध्ये पुणे जिल्ह्यातील शिवाजी कालूराम कलाने, जिल्हा परीषद प्राथमिक
विद्यालय, मांडाकी, पुरंदर, संदीप मुरलीधर आढाव, जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय,
शिरसगांव, काता, शिरूळ यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यासह श्रवण
वामन जाधव, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, थाळेवाडी, सीपीएस, अवहाना, (भोकरधन)
जालना, प्रदीप मारोती मांजरेकर, जिल्हा परीषद
प्राथमिक शाळा, वारवाडी, क्रमांक 1 (कणकवली) सिंधूदुर्ग, मच्छींद्रनाथ वासूदेव पाटील, पंकज प्राथमिक
विद्यालय, चोपडा, बोरोले नगर क्रमांक 1 चोपडा, जळगाव, बाळासाहेब संदीपन वाघ, जिल्हापरीषद प्राथमीक
विद्यालय, अकोले, सोलापूर, माधव पुंडलिक वैचळ, जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय,
पींपळखूटा, सीपीएस, बासंबा, हिंगोली, सूधाकर जगन्नाथ मडावी जिल्हा परीषद प्राथमिक
विद्यालय, हीरापूर, केंद्र अवलपूर, कोरपना, चंद्रपूर, नागदेव सखाराम धामणे, जिल्हा
परीषद प्राथमिक विद्यालय, खडकी, खंडाळा, अहमदनगर या शिक्षकांनाही राष्ट्रीय शिक्षक
पुरस्काराने गौरविण्यात आले.
9 माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय
पुरस्कार प्रदान
माध्यमीक शिक्षकांमध्ये डॉली गेविन हेन्र्ी,
वाणी विद्यालय, जे.एन. रोड, मुलुंड (पश्चीम), मुंबई. पांडूरंग रंगराव संकपाल,
शाहपूर उच्च विद्यालय, शाहपूर इंचलकंरजी, हातकंगले, कोल्हापूर. बीना रौनी लोबो, भारत शिक्षण सामाजिक कार्तिका,
उच्च विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, न्यू हॉल रोड, कुर्ला(पश्चिम), मुंबई.
कमलाकर मुरलीधर महामुनी, रयत शिक्षण संस्था, अण्णा साहेब, कल्याणी विद्यालय,
सातारा. विठ्ठल मारोती भोर, भैरवनाथ विद्यालय डोंडे, खेड राजगुरू नगर, पुणे. समीता गौतम पाटील, शांती निकेतन, माध्यमीक आणि
उच्च प्राथमिक विद्या मंदीर, सांगली. नरेंद्र भागवत पाठक, एस.के. सोमय्या विनय
मंदीर उच्च विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विद्यानगरी, विद्याविहार, मुंबई. अरूण
बहरजी सुलगेकर, पृथ्वीराज कपूर मेमोरीयल, उच्च विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,
लोणी, काळभोर, हवेली, पुणे, यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात
आले.
विशेष श्रेणी अंतर्गत निवास यशवंत शेवाळे, प्रभादेव बी.एम.सी. प्राथमिक
विद्यालय, मुरारी घाग मार्ग, प्रभादेवी,मुंबई यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने
गौरविण्यात आले.
No comments:
Post a Comment