Tuesday, 20 September 2016


स्मार्ट सिटी च्या तीस-या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 शहरांची निवड
नवी दिल्ली, 20 : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटीयोजनेंतर्गंत घेण्यात आलेल्या स्पर्धेत देशभरातील 27 शहरांची निवड आज जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 5 शहरांचा समावेश आहे. केंद्रीय शहरीविकास व गरिबी निर्मुलन मंत्री वैंकय्या नायडू यांनी पत्रकार परिषदेत ही घोषण केली.
निवड झालेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांचा समावेश आहे. यापुर्वी पहिल्या टप्प्यात पुणे व सोलापूर या शहरांची निवड झाली होती. आतपर्यंत राज्यातील एकूण 7 शहरांची निवड झालेली आहे.
आज जाहीर झालेल्या तिस-या टप्प्याच्या यादीमध्ये एकूण 12 राज्यांचा समावेश आहे. त्यामध्ये  महाराष्ट्रातील 5 शहरे, तामीळनाडू आणि कर्नाटकातील प्रत्येकी 4 शहरे,  उत्तर प्रदेशातील 3 शहरे,  पंजाब, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी 2 शहरे, आंध्र-प्रदेश, ओडीशा, गुजरात, नागालंड, सिक्कम या राज्यातील प्रत्येकी एका शहराची निवड करण्यात आलेली आहे. स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या 27 शहरांच्या 66,883 कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित आहे.

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात 20 शहरांची निवड करण्यात आली होती. दूस-या टप्प्यात 13 शहरांची निवड करण्यात झाली होती. आज तिस-या टप्प्यात 27 शहरांची निवड करण्यात आलेली आहे. 

No comments:

Post a Comment