नवी दिल्ली, १९ : कोल्हापुर जिल्ह्यातील यलगुड येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारख्यान्याला
सर्वोत्तम कागगिरीसाठी वसंतदादा पाटील पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय
राज्यातील अन्य ८ सहकारी साखर कारखान्यांनाही विविध श्रेणीत राष्ट्रीय पुरस्काराने
गौरविन्यात आले.
येथील सीरी इंस्टिट्यूशन भागातील एनसीयुआय
सभागृहात आयोजित राष्ट्रीय
सहकारी साखर कारखाना संघाच्या(एनएफसीएसएफ)
संचालक मंडळाच्या ५७ व्या बैठकीत हे पुरस्कार संघाचे
अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व मान्यवरांच्या
हस्ते प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे
उपाध्यक्ष अमीत कोरे आणि व्यवस्थापकीय संचालक एम.जी.जोशी यावेळी उपस्थित होते.
यावर्षी देशभरातून ९० सहकारी
साखर कारखान्यांनी पुरस्कारासाठी अर्ज केले होते. पैकी २१ कारखान्यांची निवड
पुस्कारासाठी करण्यात आली त्यात महाराष्ट्रातील ९ कारखान्यांचा यामध्ये समावेश
आहे. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
राज्यातील पुरस्कार प्राप्त
कारखान्यांमधे देशातून सर्वोत्तम कामगिरिसाठी वसंतदादा पाटील पुरस्कार प्राप्त
करणारा कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणगले तालुक्यातील यलगुड येथील जवाहर शेतकरी
सहकारी साखर कारखाण्याचा यावेळी सन्मान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष कलप्पांण्णा
आवाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यानी पुरस्कार स्वीकारला.
देशात उच्च प्रतिच्या
साखर उत्पादनासाठी सांगली जिल्हयातील पलूस तालुक्यातील कुंडल येथील क्रांती अग्रणी
डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारखान्याचे
अध्यक्ष अरूणअण्णा लाड यांच्यासह पदाधिका-यांनी पुरस्कार स्वीकारला.
देशात ऊस विकास
कार्यक्रमात उत्तम कामगिरीसाठी प्रदान करण्यात आलेले दोनही पुरस्कार महाराष्ट्राने
पटकावले. प्रथम पुरस्कार कोल्हापूर
जिल्हयातील शिरोळ तालुक्यातील दत्तनगर येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर
कारख्यान्याला प्रदान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यासह
पदाधिका-यांनी पुरस्कार स्वीकारला. द्वितीय पुरस्कार पुणे जिल्हयातील अंबेगाव
तालुक्यातील पारगांव येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याला प्रदान करण्यात आला.
कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत ढगे यांच्यासह पदाधिका-यांनी पुरस्कार
स्वीकारला.
तांत्रिक कार्यक्षमता
श्रेणीतील द्वितीय पुरस्कार सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुक्यातील शिरपूर येथील
श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला प्रदान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष
सुधाकर परिचारक यांच्यासह पदाधिका-यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
आर्थिक व्यवस्थापन
क्षेत्रातातील उत्तम कामगिरीसाठी जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील अंकुशनगर
येथील समर्थ सहकारी साखर कारखान्याला प्रथम पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
कारखान्याचें व्यवस्थापकीय संचालक बाजीराव
पावसे यांच्यासह पदाधिका-यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
साखर निर्यातीत उत्तम
कामगिरीसाठी प्रदान करण्यात आलेले दोनही
पुरस्कार महाराष्ट्राने पटकावले. प्रथम पुरस्कार सोलापूर जिल्हयातील माढा
तालुक्यातील गंगामाईनगर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला प्रदान
करण्यात आला. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.धनवडे यांच्यासह
पदाधिका-यांनी पुरस्कार स्वीकारला. द्वितीय पुरस्कार कोल्हापूर जिल्हयातील कागल
येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला प्रदान करण्यात आला. कारखान्याचे
व्यवस्थापकीय संचालक विजय औताडे यांच्यासह पदाधिका-यांनी पुरस्कार स्वीकारला.
देशात सर्वाधिक
उता-यासाठी सांगली जिल्हयातील वाळवा येथील पद्मभूषण क्रांतीवीर डॉ नागनाथअण्णा
नायकवडी हुतात्मा किसन अहीर सहकारी साखर कारखान्याला प्रदान करण्यात आला.
कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्यासह पदाधिका-यांनी पुरस्कार स्वीकारला.
*********
No comments:
Post a Comment