नवी
दिल्ली दि. १४ : दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ
यांनी बुधवारी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.
परिचय
केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. झिरवाळ यांचे
स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध
उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात
येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी दिली. श्री. झिरवाळ यांना महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट
स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध
विभागांना श्री. पाटील यांनी भेट देऊन
माहिती जाणून घेतली .
000000
No comments:
Post a Comment