नवी
दिल्ली, 2 : महात्मा गांधी यांची 147 वी आणि
लालबहादूर शास्त्री यांची 112 वी जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.
कोपरनिकस
मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा
सचिव आभा शुक्ला यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश
चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त भारती झाडे आणि अजीतसिंह नेगी
यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी
महात्मा
गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र सदनात स्वच्छता अभियान
महापुरूषांच्या जयंतीच्या
कार्यक्रमानंतर महाराष्ट्र सदनाच्या आवारात
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता करण्यात आली. निवासी
आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला , राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर
सहाय, सहायक निवासी आयुक्त भारती झाडे आणि अजीतसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र
सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला .
No comments:
Post a Comment