नवी
दिल्ली दि. 21 : ग्रामीण माती-संस्कृतीशी जुळलेली भूमिका करण्याची भावना
अभिनेत्री वृषाली हटाळकर यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केली .
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने दिल्लीत
आयोजित कार्यक्रमात सादरीकरणासाठी आलेल्या वृषाली हटाळकर यांनी आज परिचय केंद्राला
भेट दिली. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेत त्यांनी या भावना व्यक्त केल्या. परिचय
केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी वृषाली हटाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन
स्वागत केले. तसेच, नृत्यांगना रोशनी उर्फ सविता म्हात्रे, लावणी सम्राट ग्रुपचे
प्रमुख प्रमोद कोंदळकर यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू
निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार, दैनिक सामनाचे दिल्ली प्रतिनिधी निलेश
कुलकर्णी, वरिष्ठ पत्रकार विनीत वाही यावेळी
उपस्थित होते.
वृषाली
हटाळकर यांनी दूरशर्नच्या सहयाद्री वाहीनीवरील ‘दामीनी’ या नाटकातून अभिनयाला सुरुवात झाली.
त्यानंतर ‘मी माझ्या मुलांचा’, ‘वाटा-पळवाटा’ आणि ‘बरसात’ या नाटकात प्रमुख भूमिका केल्या. ‘तो येतो’, ‘अब्राहम’, ‘लग्नाची वरात लंडणच्या घरात’, ‘डम-डम डिगा डिगा’ अशा नऊ मराठी चित्रपटात काम केले
असून सहा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी शिवाय तेलगू,
पंजाबी, भोजपूरीसह दक्षिणेतील
चित्रपटांमध्ये भूमिका केल्याचे त्यांनी सांगितले. व्हिडीयो अल्बम आणि
जाहीरातीही केल्या. ग्रामीण भागातून संघर्ष करून आपण अभिनय क्षेत्रात पुढे आलो
असल्याने ग्रामीण माती-संस्कृती यांच्याशी जुळलेली भूमिका करण्याची इच्छा असल्याचे
वृषाली हटाळकर म्हणाल्या.
जीवन हेच एक पुस्तक असून माणस
वाचनातून मी घडत गेल्याचे हटाळकर सांगतात. हाच, अनुभव गाठीशी घेऊन अभिनयालाही धार आली. लग्नानंतर
आपली कारकीर्द बहरल्याचे त्या अभिमानाने सांगतात. लग्नानंतर तेलगू, पंजाबी, भोजपुरी, शिंदी आणि मराठी अशा भाषांमधे नामवंत
कलाकारांसोबत अभिनय करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नृत्य आणि
गायनातही हटाळकर प्रवीण आहेत. अभिनयाच्या विविध प्रातांमध्ये अजून मोठी भरारी
घ्यायची आहे त्यासाठी नवनवीन गोष्टी शिकतेय असेही वृषाली हटाळकर म्हणाल्या.
0000000
No comments:
Post a Comment