Tuesday, 25 October 2016

महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीस केंद्राची मंजुरी


नवी दिल्ली दि. 25 : सोयाबीन खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाने पाठविलेल्या प्रस्तावास मंगळवारी केंद्र शासनाने मंजुरी देत ऐन दिवाळीच्या तोंडावर  राज्यातील शेतक-यांना दिवाळी भेट दिली आहे.

            केंद्र शासनाने मूल्य समर्थन योजनेअंतर्गत खरीफ हंगाम २०१६-१७ साठी राज्य शासनाला सोयाबीन खरेदीची मंजुरी दिली. या निर्णयानुसार केंद्र शासनाने महाराष्ट्रात सोयाबीन खरेदी करण्यासाठी नाफेड आणि लघू कृषक कृषी व्यापारी संघांना(एसएफएसी) सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने सोयाबीन खरेदीसाठी न्यूनतम समर्थन मूल्यासंदर्भात केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता.त्यास ऐन दिवाळीच्या तोंडावर केंद्राने मंजुरी दिल्याने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची दिवाळी होणार आहे .   
                                                           0000000



No comments:

Post a Comment