Wednesday, 19 October 2016

वस्तू व सेवा कर कायद्यामुळे राज्यातील उद्योगांना होणार फायदा ; वित्तमंत्री मुनगंटीवार










                              नवी दिल्ली दि. 19 : वस्तू व सेवा कर कायदा हा देशाच्या हिताच्यादृष्टीने महत्वाचा आहे. राज्यातील उद्योगांना या कायद्याचा फायदा होणार असल्याचे राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात सांगितले.
          विज्ञान भवन येथील वस्तू व सेवा कर परिषदेची बैठक आटोपल्यानंतर श्री. मुनगंटीवार यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेत त्यांनी ही माहिती दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. मुनगंटीवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार, दैनिक सामनाचे दिल्ली प्रतिनिधी निलेश कुलकर्णी, मंथन प्रतिष्ठान चे आनंद रेखी यावेळी उपस्थित होते.   
              श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले, केंद्र शासनाच्यावतीने राज्यात स्टॅण्ड अप इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि मुद्रा योजनेअंतर्गत उत्तम काम सुरु आहे. राज्यात लघू आणि मध्यम उद्योगांना याचा चांगला फायदा होत आहे. राज्यात वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीसाठी तयारी सुरु आहे. या कराच्या माध्यमातून कर चोरीला आळा बसेल आणि उद्योजकांना दयावे लागणारे विविध कर संपुष्टात येऊन एक कर प्रणाली लागू होईल आणि व्यापारात सर्वांना समान संधी मिळेल. राज्यातील कापड, चर्म उद्योगांसह अन्य उद्योगांसाठी हा कायदा महत्वाचा ठरेल असेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी अलबर्ट स्टोनब्राइड ग्रुपचे संचालक सौम्या घोष यांनी श्री. मुनगंटीवार यांची भेट घेतली. महाराष्ट्रात गुंतवणूकी संदर्भात सौम्या घोष यांनी इच्छा व्यक्त केली.  
             महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी         श्री. मुनगंटीवार यांना दिली. श्री. मुनगंटीवार यांना यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना  भेट देऊन श्री. मुनगंटीवार यांनी माहिती जाणून घेतली. श्री. मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामा बद्दल समाधान व्यक्त केले.

0000000

No comments:

Post a Comment