नवी दिल्ली, 3 : राज्यातील जनावरांच्या उपचारांसाठी लवकरच
रूग्णवाहिकांची सेवा उपलब्ध करण्यात येणार असल्याची महिती राज्याचे पशुसंवर्धन, मत्स्य आणि दुग्ध विकास
मंत्री श्री महादेव जानकार यांनी दिली.
श्री जानकर यांनी आज कृषी भवन येथे पशुसंवर्धन, मत्स्य
आणि दुग्ध व्यवसाय सचिव देवेंद्र चौधरी यांची भेट घेतली. या बैठकीत पशुसंवर्धन,
मत्स्य व दुग्ध विकास या विषयांवर चर्चा
करण्यात आली. जनावरांसाठी रूग्णवाहिकेचा उपक्रम प्रथमच राबविण्यात येणर असून
यासाठी केंद्र शासनाकडे निधीची मागणी कारण्यात आली आहे. याशिवाय स्वयंसेवी
संस्थाचीही मदत यासाठी घेतली जाणार आहे. जनावरांच्या उपचारासाठी जाणारी
रूग्णवाहिका उपचारासाठी वेळेत पोहचते की नाही याची देखरेख करणारी यंत्रणा
मंत्रालयात उभारण्यात येईल अशी माहितीही श्री जानकर यांनी दिली. यासह पशुसंवर्धन
विषयाची गरज लक्षात घेता राज्यात आणखी दोन पशु वैद्यकीय महाविद्यालयांची गरज असून
लवकरच याबाबत निणर्य घेण्यात येणार असल्याचेही श्री जानकर यांनी यावेळी सांगितले.
राज्यात
शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारणार
बदलते
हवामान, अवकाळी पाऊस, दुष्काळ या नैसर्गिक विषम परिस्थितीचा सामना शेतक-यांना करावा लागतो. बरेचदा त्यांचे मनोबल ढासळते. यासह
काळाची गरज बघता आधुनिक पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे. ज्यामुळे शेतक-यांचे
कमीतकमी आर्थिक नुकसान होईल, तसेच दुग्ध, मत्स्य आणि पशु संवर्धन करण्याचे अद्यावत
प्रशिक्षण देण्याचीही गरज आज शेतक-यांना आहे. यासाठीचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची
आवश्यकता आहे. महाराष्ट्र शासन अशा प्रशिक्षण
केंद्रासाठी जमीन उपलब्ध करून देईल. राज्य शासनाने याविषयांवर सविस्तर प्रस्ताव
सादर करावा. असे प्रशिक्षण केंद्र उभारण्यास केंद्राकडून निधी उपलब्ध होईल, असे
श्री चौधरी यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment