Wednesday, 5 October 2016

रंगमंच माझी आई :अभिनेता मनोज जोशी




नवी दिल्ली, 5 : रंगमंच ही माझी आई आहे आणि संगीत नाटक अकादमीचा मिळालेला पुरस्कार हा आई सरस्वतीचा आर्शिवाद आहे. असे भावोदगार, चाणक्य फेम चरित्र अभिनेता मनोज जोशी यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात काढले.
मंगळवारी राष्ट्रपती यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. मनोज जोशी यांना त्यांच्या नाटक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. परिचय केंद्राच्यावतीने मनोज जोशी यांचा या निमित्ताने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक श्री दयानंद कांबळे यांनी श्री जोशी यांचे शाल, श्रीफल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी उपस्थित पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालापाचा कार्यक्रम रंगला. यावेळी जोशी म्हणाले, मी माझ्या अंतीम श्वासापर्यंत नाटय क्षेत्रात काम करीत राहीन. 1986 पासून चाणक्य या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. लवकरच या नाटकाचा 1,000 वा प्रयोगही होणार आहे. त्यामुळे नाटक क्षेत्राशी माझे नाते हे अतुट असे आहे. हिंदी, मराठी, गुजराती या तिन्ही भाषेत चांगले नाटक मिळाल्यास करायला आवडेल असेही श्री जोशी यांनी सांगितले.
पत्रकारांशी झालेल्या प्रश्नोत्तरात श्री जोशी म्हणाले, कालीदासांच्या काळापासून नाटक रचले, रंगविले जात आहे. त्यामुळे नाटक या क्षेत्राला मरण नाही. मात्र प्रेक्षकही तेवढेच चोखदंळ असल्यामुळे त्या-त्या नाटकाप्रमाणे प्रतिसाद मिळतो. हिंदीच्या तुलनेत मराठी, गुजराती तसेच अन्य बोली भाषेतील नाटक अधिक प्रभावी असतात. कारण त्यांच्यामागे तेथील लोक पंरपरा, लोक संस्कृतीची पाश्वभुमी असते. कला-संस्कृती ही आपल्या धमण्यांमधून वाहत असल्याचे ही ते म्हणाले.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्यावर कसे वाटत आहे, या प्रश्नाच्या उत्तराला श्री जोशी यांनी आपली आता खरी सुरूवात झाली आहे तसेच जबाबदारी ही वाढली आहे. त्यांनी हा पुरस्कार आपल्या आई-वडील तसेच कला क्षेत्रात त्यांना मदत करणा-या सर्वच सहाय्यकांना समर्पित केला.

स्मिता तळवळकर आणि संजय सुरकर यांच्यामुळेच घडलो

दिवगंत स्मिता तळवळकर आणि संजय सुरकर यांच्या मुळेच आपण घडलो आहोत. असे मनोज जोशी यांनी प्राजंळपणे सांगितले. 1990 च्या दशकात मनोज जोशी यांनी ना.स. इनामदार लिखीत राऊ’ या कांदबरीवर आधारीत दुरदर्शनवरील राऊ’ या मालिकेत बाजीराव पेशव्यांची भुमिका केली होती. जोशी यांची ही मराठीतील पहिलीच मालिका होती. अभिनय क्षेत्राच्या सुरूवातीलाच एवढी चांगली भुमिका मिळाल्याबद्दल आनंद झालाच होता. मात्र स्मिता तळवळवर आणि संजय सुरकर यांनी माझ्याकडून खूप मेहनत करवुन घेतली. आज आपण जे काही आहोत त्यांच्यात या दोन व्यक्तीचा मोठा वाटा असल्याचे  सांगितले.

No comments:

Post a Comment