नवी दिल्ली, 9 : महाराष्ट्रात तीन लाख “कौशल्य सखी” निर्माण करण्याचे राज्य शासनाचे ध्येय असल्याची माहिती, कामगार
व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील यांनी आज दिली.
येथील विज्ञान भवनात
केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्या दूसरा स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री पाटील बोलत
होते. यावेळी केंद्रीय कौशल्य विकास (स्वतंत्र प्रभार) मंत्री राजीव प्रताप रूढी, विविध
राज्यांचे कौशल्य विकास मंत्री, केंद्रीय विभागाचे सचिव तसेच राज्याचे कौशल्य
विकास विभाचे सचिव दिपक कपूर उपस्थित होते.
राज्य
सरकार “ कौशल्य सखी ” अंतर्गत महिलांना वेगवेगळया
क्षेत्रातील कौशल्य प्रदान करणार आहे. यामाध्यातून कूशल महिला वर्ग तयार करण्याचे राज्याचे ध्येय
असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.
विविध 24 खाजगी संस्थांशी करार
राज्यातील तरूणांना
अधिकधिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळावे, यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. यासाठी
वेगवेगळया 24 खाजगी संस्थांशी राज्यशासनाने करार केला असल्याची, माहिती श्री पाटील
यांनी यावेळी दिली.
उद्योजकता केंद्र
राज्यातील
अनेक जिल्हयात उद्योजकता केंद्र राज्यशासनाने उभारले आहे. जिथे कौशल्य विकासांशी
संबधित संपूर्ण माहिती दिली जाते
परदेशात नोकरी
राज्यातील
कुशल मनुष्यबळाला परदेशात नोकरी मिळण्यासाठी अंतरराष्ट्रीय खाजगी संस्थाशी चर्चा
सुरू आहे. यामध्ये राज्यातील प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाला ठरावीक काळासाठी
करारबद्ध करून परदेशात नोकरीकरिता पाठविण्यात येईल.
मागील दोन वर्षात
राज्याव्दारे कौशल्य विकासाशी संबंधित अनेक पाऊले उचलली गेली, त्याची माहिती श्री
पाटील यांनी यावेळी दिली. राज्यात कौशल्य विकासाशी संबधित रोजगार मेळावे आयोजित
केले जात आहे. यातून तरूणांमध्ये मोठया प्रमाणात जागृती निर्माण होत असल्याचे ही
श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment