नवी दिल्ली 10 : राज्य
शासनांच्या सहाय्याने राष्ट्रीय माहिती व संचार धोरण तयार करावे, असे आवाहन केंद्रीय
माहिती व प्रसारण मंत्री वैंकय्या नायडू यांनी आज येथे केले.
केंद्रीय माहिती व
प्रसारण मंत्रालयाच्यावतीने विज्ञान भवनात २८ व्या ‘राज्यांच्या माहिती मंत्र्यांच्या परिषदे’ चे (SIMCON) आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्री नायडू बोलत
होते. या दोन दिवसीय परिषदेच्या दुस-या दिवशी
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वैंकय्या नायडू, केंद्रीय माहिती व
प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन
राठोड,केंद्रीय माहिती व प्रसारण सचिव अजय मित्तल मंचावर उपस्थित होते. विविध
राज्यांचे माहिती व जनसंपर्क विभागांचे मंत्री, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या विविध
विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव, महासंचालक, संचालक बैठकीस
उपस्थित होते.
माहिती व संचार
धोरणाचे महत्व विशद करून श्री नायडू म्हणाले, संचार संरचनेची आज सर्वाधीक गरज आहे.
ही गरज लक्षात घेता जनतेच्या समस्या, या क्षेत्रातील आव्हाने आणि माध्यमांच्या बदलत्या
भुमिका लक्षात घेऊन सर्वसमावेशक माहिती व संचार राष्ट्रीय धोरण असणे आवश्यक आहे. हे धोरण तयार करीत असताना राज्यांची
भुमिका सर्वाधिक महत्वपुर्ण असणार आहे. यासाठी
राज्यांनी सर्वकष सहाय्य करावे, असे श्री नायडू म्हणाले.
प्रस्तावीत माहिती व संचार धोरण हे व्यापक
असावे, यामध्ये ग्रामीण जनतेलाही माहिती व
संचाराचा लाभ मिळावा यासाठी पायाभूत सुविधा आणि नवीन तंत्रज्ञान विकसीत करण्यावर
श्री नायडू यांनी भर दिला. यासह जनतेच्या सहभागाशिवाय काहीही शक्य नाही म्हणून
माहिती व संचार माध्यमातही जनतेची भुमिका सर्वाधिक महत्वपुर्ण असल्याचे व्यक्त
करून माहिती व संचार धोरणात जनतेची अधिकाधीक भागीदारी कशी वाढेल यावर भर देण्यात
यावे असे ही श्री नायडू म्हणाले.
जनतेपर्यंत माहिती देण्यासाठी
बहुक्षेत्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेत, व्यवस्थीत आणि सत्य माहिती देण्यात यावी
असे सांगुन राष्ट्राला हानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे श्री नायडु
यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment