Wednesday, 14 December 2016

महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाला ‘ऊर्जा संवर्धना’साठी प्रथम पुरस्कार


नवी दिल्ली, 14 : महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण (मेडा) ला ऊर्जा संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल केंद्रीय ऊर्जा मंत्री  पियुष गोयल यांच्या हस्ते  प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनम्हणुन साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून  केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने येथील ली मेरीडन हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षता केंद्रीय ऊर्जा, नवीन व नविनीकरणीय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) पियुष गोयल यांनी केली. श्री गोयल यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धन करणा-या विविध शासकीय, खाजगी संस्थाना यावेळी विविध श्रेणीतील पुरस्काराने गौरविण्यात आले.
राज्य शासनांतर्फे ऊर्जा संवर्धनासाठी उत्कृष्ट काम करणा-या संस्थामधून महाराष्ट्रातील पूणे येथील महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकारणला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाचे ऊर्जा संवर्धन विभागाचे महाव्यवस्थापक  हेमंट पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  

महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाची स्थापना 1986 मध्ये झाली असून नवीन व नवीनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात ही संस्था काम करते. या प्राधिकरणानी ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रात महत्वपुर्ण कामगिरी केली आहे. यामध्ये एलऐडी बल्ब आणि टयुब लाईटवरील मुल्य वर्धीत कर 1२.५ % टक्क्यांवून 5 % टक्क्यांवर आणले आहे.  राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयात तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत 4 व5 स्टार लेबल असणारे एलऐडी लाईटस वापरणे बंधनकारक केले आहे. देशातील पहीले राज्य ज्यांनी केंद्र शासनाच्या ऊर्जा विभागातील ऊर्जा दक्षता ब्यूरोच्या धर्तीवर राज्यातही एलऐडी वापरणा-या संस्थाना पुरस्कार देण्याचे जाहीर केले.  राज्यातील 870 उद्योगांचे ऊर्जा   अंकक्षेण (ऑडीट)करून 103 कोटी रूपयें वाचविले आहेत.  देशातील पहीजे राज्य ज्यांनी वाया जाणारी विजेचे संवर्धन करण्यासाठी योजना राबविली आहे. महाराष्ट्र हे सर्वात प्रथम जिथे  ऊर्जा संवर्धनसाठी राज्य नियामक आयोग स्थापना केला.  राज्यातील सर्व ऊस कारखान्यांना  ऊर्जाचे अंकेक्षण (ऑडीट)व्हावे असे बंधनकारक केले आहे. ऊर्जा संवर्धन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सर्व उपाय योजनेसाठी राज्याला आज पुरस्कृत करण्यात आले.

No comments:

Post a Comment