नवी
दिल्ली, दि. 15 : भुमिपुत्रांसाठी रोजगार हा वैश्विक विचार असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे
खासदार अनिल देसाई यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात केले.
राज्यसभा
खासदार अनिल देसाई यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यावेळी
झालेल्या अनौपचारीक गप्पांमध्ये श्री देसाई बोलत हेाते. परिचय केंद्राचे उपसंचालक
दयानंद कांबळे यांनी श्री देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माहिती
अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, दैनिक सामनाचे दिल्ली प्रतिनिधी निलेश कुलकर्णी उपस्थित
होते.
श्री देसाई म्हणाले, भुमिपुत्रांना स्थानिक ठीकाणी रोजगार
मिळावा यासाठी सुरू केलेली लोकाधिकार चळवळीला आता फळे येत आहेत. राज्यातील युवावर्ग
सर्वच क्षेत्रात पुढे असून विदेशात महाराष्ट्राचे नाव उंचावत आहे. भुमिपुत्रांसाठी
रोजगार हा आज वैश्विक विचार आहे. आज अनेक राष्ट्र हा विचार अनुसरत असल्याचे श्री
देसाई यांनी सांगितले. शिवसेना संस्थापक
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीना श्री देसाई यांनी यावेळी उजाळा दिला. बाळासाहेबांची
भुमिका ही पालकत्वाची होती, असे सांगुन त्यांच्यामुळे आपण घडलो असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी परिचय केंद्राचे उपसंचालक श्री.कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय
केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात
येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची
माहिती श्री. देसाई यांना दिली. श्री. देसाई यांना यावेळी महाराष्ट्र परिचय
केंद्राची ‘प्रकाशने’ तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्राचे
संकलीत असलेले ‘फटकारे’ हे पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले.
परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच
कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. देसाई यांनी माहिती जाणून घेतली.
श्री. देसाई यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामा बद्दल समाधान व्यक्त केले.
No comments:
Post a Comment