Monday, 19 December 2016

राज्यमंत्री रामदास आठवले यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट





नवी दिल्ली, दि. 19 : केंद्रीय सामजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.

परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री आठवले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, स्वतंत्र पत्रकार निवेदिता खांडेकर तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री श्री आठवले यांच्याशी याप्रसंगी सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयांवर विविधांगी चर्चा झाली.  


यावेळी परिचय केंद्राचे उपसंचालक श्री.कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्ली येथे राबविण्यात येणारे उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वयाविषयी श्री आठवले यांना माहिती दिली. श्री. आठवले यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. 

No comments:

Post a Comment