नवी
दिल्ली, दि. 21 : ग्रामीण
शैलीच्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांच्या ‘आलोक’ या लघुकथ संग्रहास वर्ष 2016 चा साहित्य
अकादमी पुरस्कार आज घोषित करण्यात आला.
साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा
रवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात आज करण्यात आली. देशातील २4 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट पुस्तकांची निवड
करण्यात आली. आज जाहीर झालेल्या पुरस्कारांमधे आठ काव्य संग्रह, सात लघुकथा
संग्रह, पाच कांदबरी, दोन समिक्षा, एक निबंध यासह एक नाटक यांचा समावेश आहे. 1 लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून
पुढील वर्षी 22 फेब्रुवारी 2017 रोजी या
पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
‘लघु कथा’ या
साहित्य प्रकारात प्रसिध्द मराठी लेखक आसाराम लोमटे लिखित ‘आलोक’ या लघुकथा संग्रहास मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड
करण्यात आली. या लघुकथा संग्रहात ग्रामीण जीवनाविषयीचे जीवंत
आस्था असणारे वर्णन श्री लोमटे यांनी असल्ल ग्रामीण शैलीत मांडले आहे. ग्रामीण
जीवनातील बारीक-सारीक घटना तपशीसांसह लिहून वाचकांसामोर प्रसंग उभे केले आहेत. इतिहासाऐवजी वर्तमानात समाज परिस्थितीचे वास्तव ‘आलोक’
या लघुकथा संग्रहात आहे.
मराठी साहित्यातील
पुस्तक निवडीसाठीच्या समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावने, डॉ.
मनोहर जगन्नाथ जाधव, डॉ. चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता.
No comments:
Post a Comment