Wednesday, 21 December 2016

हिंदुस्थान एंटिबायोटीक्सची अतिरिक्त तसेच रिकामी जमिन विकण्याचा निर्णय


नवी दिल्ली दि.21 :  पुण्यातील पिंपरी भागात असणारी हिंदुस्थान एंटिबायोटीक्स कपंनीची अतिरिक्त तसेच रिकामी जमिन विकण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
हिंदुस्थान एंटिबायोटीक्स लिमीटेड ही कंपनी नुकसान सहन करीत आहे. येथील कर्मचा-यांचे पगार काढणेही कठीत होत आहे. त्याकरिता मंत्री मंडळ समितीने या कंपनीची अतिरिक्त व रिकामी जमिन विकाण्याची शिफारस मांडली होती. त्यावर आज मंजुरी देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबीनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  हिंदुस्थान एंटीबायोटीक्सची अतिरिक्त तसेच रिकामी जागा जवळपास  87.70 एकर आहे. हिंदुस्थान एंटीबायोटीक्सवर 307.23 कोटी रूपयांचे कर्ज आहे. यामध्ये मुळ रक्कम 186.96 कोटीची आहे तर व्याजाची  रक्कम 120.27 कोटी  (30.9.2017) पर्यंत आहे. यासह विविध देय विलंब 128.68 कोटी रूपयांचे आहे.

भारत सरकारने कर्मचा-यांच्या पगार आणि इतर महत्वाच्या गरजांसाठी 100 कोटी रूपये ताबडतोब मंजुर केलेले आहेत.  आजच्या बैठकीत या कंपनीतील कर्मचा-यांचे पुर्नवसन, योजनाबद्ध पद्धतीने विक्री कशी करता येईल यासह कंपनीच्या ताळेबंदविषयी मंत्री मंडळच्या समितीच्या शिफारसीप्रमाणे निर्णय घेण्याचे ठरले. 

No comments:

Post a Comment