नवी दिल्ली दि. 10 : देहू-आळंदी-पंढरपूर पालखी मार्गाच्या तांत्रिक बाबींना आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालयाने तत्वत: मान्यता दिली. पालखी मार्गाचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल लवकर सादर करण्याचे आदेशही देण्यात आले.
परिवहन भवन येथे केंद्रीय भूपृष्ठ
वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत
आज देहू-आळंदी-पंढरपूर पालखी मार्गासंदर्भात बैठक झाली. यावेळी राज्याचे सार्वजनिक
बांधकाम मंत्री(सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम व
पर्यटन राज्य मंत्री मदन येरावार,अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी
यांच्यासह राज्य व केंद्र शासनाने वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय
महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने बांधण्यात येणा-या देहू-आळंदी-पंढरपूर या २५० कि.मी
मार्गाच्या विविध तांत्रिक बाबींसंदर्भात यावेळी सादरीकरण करण्यात आले. पुणे,
सातारा आणि सोलापूर या जिल्हयांतून जाणा-या पालखी मार्गावर १३ ठिकाणी पालखी थांबे ( पालखी विसावा)आहेत.आषाढी एकादशीच्या काळात या पालखी
मार्गाहून जाणा-या वारक-यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत तयार करण्यात आलेल्या
तांत्रिक नियोजनावर यावेळी चर्चा झाली. यावेळी श्री. गडकरी यांनी पालखी मार्गावर
वारक-यांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या उपाय योजना करण्यासंदर्भात सूचना केल्या.
पालखी सोबत पायी चालणा-या लाखो वारक-यांसाठी उत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करून
रस्त्यावर अपघात रोखण्यासाठी सुरक्षेची काटेकोर काळजी घेण्याचे आदेश त्यांनी दिले.
पालखी
विसाव्याच्या ठिकाणी वारक-यांना रस्ते वाहतुकीची अडचण निर्माण होणार नाही यासाठी
पर्यायी मार्ग बांधण्याची योजना आहे. तसेच, विसाव्याच्या ठिकाणी भक्त निवास,
स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. या संदर्भात बोलताना श्री. गडकरी यांनी विसाव्याच्या
ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देताना स्वच्छतेची पूरेपूर काळजी घेतण्यात यावी अशा
सूचना केल्या. पंढरपूर वारी शिवाय अन्य काळात या भक्त निवासाचा उपयोग परिसरातील
लग्न समारंभ वा अन्य कार्यक्रमांसाठी करण्यात यावा त्यातून मिळणा-या पैशांमधून
पालखी विसाव्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या वास्तू व सुविधांचे व्यवस्थापन करावे
अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पर्यटन
विभागाने पालखी मार्गावर सौंदर्यीकरण करावे
पालखी मार्गावर ठिक-ठिकाणी संत
ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आदी संताच्या मुर्त्या उभारणे, मोठया एलईडी
स्क्रीन उभारून संताच्या अभंगवानीचे सादरीकरण करणे आदींसह विविध पध्दतीने सौंदर्यीकरण
करावे, त्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने पुढाकार घ्यावा अशा सूचना श्री. गडकरी
यांनी यावेळी केल्या. पर्यटन राज्य मंत्री मदन येरावार यांनी या सूचनांनुसार पालखी
मार्गावर सौंदर्यीकरणासाठी पर्यटन विभाग काम
करेल असे सांगितले.
0000000
No comments:
Post a Comment