Monday, 9 January 2017

कृष्णा पाणी वाटप ; महाराष्ट्राचा वाटा कायम -सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

                             

नवी दिल्ली दि. 09 : सर्वोच्च न्यायालायाने आज तेलंगनाची याचिका फेटाळत कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत महाराष्ट्राच्या वाटयाला येणारे ६६६ टिएमसी पाणी कायम राहणार असल्याचा निर्णय दिला.  
            कृष्णा नदीच्या पाणी वाटपाबाबत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा राज्याचे प्रकल्प निहाय पाणी वाटप पुन्हा करण्याच्या तेलंगनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. मदन लोकुर आणि पी.सी. पंत यांच्या खंडपिठाने आज  हा निर्णय दिला. गेल्या २ वर्षांपासून या विषयावर कृष्णा पाणी लवादा समोर सुनवणी सुरू आहे. लवादाचे अध्यक्ष न्या. ब्रिजेश कुमार आणि सदस्य न्या. बी.पी.दास, न्या. राम मोहन रेड्डी यांनी कृष्णा नदीच्या पाणी वाटपाबाबत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगना राज्याचे प्रकल्प निहाय पाणी वाटप पुन्हा करण्यात यावे ही आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्याची मागणी गेल्यावर्षी ऑक्टोबर महीन्यात फेटाळून लावली. या निर्णयाला तेलंगणाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  
            आज सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आले असता, तेंलगाना, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचा  युक्तीवाद ऐकून तेलंगानाची याचिका फेटाळण्यात आली.  
आजच्या निर्णयात कलम ८९ च्या आंध्रप्रदेश राज्य निर्मिती कायदा २०१४ नुसार पाणी वाटपाबाबत निकाल झाला. या कलमान्वये फक्त तेलंगना आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी त्यांच्या वाटयाचे १००५ टीएमसी पाणी आपसात वाटून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले .  
    महाराष्ट्र शासनाच्यावतीने सरकारी वकील दीपक नारगोलकर यांनी बाजू मांडली.
0000000

            

No comments:

Post a Comment