नवी
दिल्ली, 03 : क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.
कोपरनिकस
मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा
सचिव आभा शुक्ला यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर
सहाय, सहायक निवासी आयुक्त संजय आघाव, अजीतसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन
तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या
प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात सावित्रीबाई फुले यांना
अभिवादन
महाराष्ट्र
परिचय केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प
अर्पण करून आदरांजली वाहिली. उपसंचालक श्री.
कांबळे, माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांच्यासह कमलेश पाटील, निलेश केदारे आणि
रघुनाथ सोनवने यांनी यावेळी सावित्रीबाई
फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांनी सावित्रीबाई
फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
00000
No comments:
Post a Comment