Tuesday, 21 February 2017

राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी भारताच्या संरक्षण प्रदर्शनीचे केले प्रतिनिधीत्व

















नवी दिल्ली,21: केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी संयुक्त अरब अमिरात येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शनीचे भारताच्यावतीने प्रतिनिधीत्व केले.
 या प्रदर्शनीचे उदघाटन 19 फ्रेब्रुवारीला झाले. येथे विविध देशातील संरक्षण विभागाच्यावतीने अद्यावत शस्त्रांचे प्रदर्शन मांडले होते. भारताच्या संरक्षण दलाची अध्यक्षता संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली. याठीकाणी भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) च्यावतीने ब्रम्होस आणि झेन तंत्रज्ञान मांडण्यात आले. या दालनाला राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी भेट दिली. या प्रदर्शनीचा समारोप 21 फ्रेबुवारीला झालेला आहे.
या दरम्यान डॉ. भामरे यांनी संयुक्त अरब अमिरात सरकारच्या महत्वाच्या मंत्र्यांची भेट घेतली. यासह याठिकाणी उपस्थित विविध देशातील संरक्षण मंत्र्यांचीही भेट घेऊन आवश्यक विषयांवर चर्चाही केली.  


No comments:

Post a Comment