नवी दिल्ली,21: ‘लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र’ या
पुस्तकास साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2016 आज जाहीर झालेला आहे. या पुस्तकाचा अनुवाद मिलिंद
चंपानेरकर यांनी केलेला आहे.
साहित्य अकादमीचे
अध्यक्ष प्राध्यापक विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या बैठकीत
मराठी भाषेच्या अनुवादकासाठी मिलिंद चंपानेरकर यांच्या नावाची निवड करण्यात आली. अन्य
21 भाषेसाठीही साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार 2016 जाहीर झालेला आहे. या पुस्तकांची निवड समिती ही त्रिसदस्यी असते.
सईद अख्तर मिर्जा
लिखीत एम्मी : लेटर टु ए
डेमोक्रेटिक मदर (आत्मकथा) ही पुस्तक मुळ
इंग्रजीत आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला आहे. साहित्य अकादमीच्यावतीने डॉ. दिलिप धोंडगे,
डॉ. माया पंडित, डॉ. संतोषकुमार भुमकर ही त्रिसदस्यी समिती मराठी अनुवादकाच्या पुस्तकासाठी
नेमण्यात आली होती.
1 जानेवारी 2010 ते 31
डिसेंबर 2014 पर्यंतच्या काळात अनुवाद झालेल्या प्रकाशीत पुस्तकांची निवड या
पुरस्कारासाठी करण्यात आलेली आहे. या पुरस्काराचे स्वरूप 50, हजार रूपये रोख,
उत्कीर्ण ताम्रपदक असे आहे. हे पुरस्कार एका विशेष समारोहात प्रदान केले जातील.
No comments:
Post a Comment