Saturday, 18 February 2017

महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी











          
नवी दिल्ली दि. १९ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांची ३८७ वी जयंती महाराष्ट्र सदनात  साजरी करण्यात आली. 
        कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयाजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त संजय आघाव, अजितसिंह नेगी  यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचा-यांनी व दिल्लीत कार्यरत विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  

                                                                                            0000

No comments:

Post a Comment