Saturday, 11 March 2017

राजधानीत यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी


                  

नवी दिल्ली, 12 : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे  साजरी करण्यात आली.  
            कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, सहायक निवासी आयुक्त अजीतसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  

                                                                       00000

No comments:

Post a Comment