नवी
दिल्ली, 15 : महाराष्ट्राचे
सुपूत्र व दिल्लीतील सिमापुरी उप विभागाचे सहायक पोलीस आयुक्त हरेश्वर स्वामी
यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली .
महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद
कांबळे यांनी श्री स्वामी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. कांबळे यांनी
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या प्रसार भारती विभागाचे संचालक गणेश रामदासी
यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू
निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार यावेळी उपस्थित होते.
हरेश्वर स्वामी हे मुळचे लातूर जिल्हयातील उदगीर तालुक्यातील लोहारा गावचे
सुपूत्र असून, २०१३ बॅचचे भारतीय पोलीस
सवेतील अधिकारी आहेत. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने
दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने
आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी श्री. स्वामी यांना दिली. श्री. स्वामी यांना
यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय
केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. स्वामी यांनी माहिती जाणून
घेतली. श्री. स्वामी यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामा बद्दल समाधान व्यक्त
केले व शुभेच्छा दिल्या.
00000
No comments:
Post a Comment