नवी दिल्ली, 23 :
राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार प्राप्त कोल्हापूर येथील दिपक कुंभार
आणि मुंबईचे अतुल चौबे यांनी आज
महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली .
दिपक
कुंभार आणि अतुल चौबे यांना माहिती व
प्रसारण मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार आज
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वैंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात
आले. श्री. कुंभार आणि श्री. चौबे यांच्या उत्तमकामगिरीसाठी परिचय केंद्राच्यावतीने
सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी
श्री. कुंभार आणि श्री. चौबे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
माहिती
व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने ‘स्किल इंडिया’ आणि ‘स्वच्छ
भारत’ या संकल्पनेवर आधारीत स्पर्धेत देशातील १२ छायाचित्रकारांच्या छायाचित्रांची
निवड झाली . दिपक कुंभार यांना ‘स्वच्छ भारत’ संकल्पनेवर आधारीत छायाचित्रासाठी तर अतुल चौबे यांना ‘स्किल इंडिया’ संकल्पनेवरील छायाचित्रासाठी हा
पुरस्कार प्रदान करण्यात आला. परिचय केंद्रात यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेत उभय
छायाचित्रकारांनी छायाचित्रकारीता क्षेत्रातील आपले अनुभव मांडले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात
येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार
माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी उभय
छायाचित्रकारांना दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशनेही त्यांना
सदस्यांना भेट स्वरूपात देण्यात आली.
0000
No comments:
Post a Comment